रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया या देशाने तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशियाने घातलेल्या या बंदीमुळे भारतात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे. महिन्याभरात पामतेलाच्या किमतीत 25 रुपयांची वाढ झाली आहे. खाद्यतेलांच्या किमतीत झालेल्या या दरवाढीमुळे फरसाण, वेफर्स, नूडल्स, साबण, शाम्पूंच्या दरांतही वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
फरसाण आणि वेफर्सचेही दर कडाडणार
इंडोनेशियाकडून खाद्यतेल आयात करणा-या देशांत चीन आणि भारत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतामध्ये 65 टक्के पामतेल हे इंडोनेशियातून आयात होते. इंडोनेशियाने निर्यातबंदी केल्यामुळे आयातीवर परिणाम झाला असून, बाजारभाव वाढले आहेत. पामतेलावर अवलंबून असलेल्या फरसाण, वेफर्सच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे, भरत ठक्कर या आयातदाराने म्हटले आहे.
( हेही वाचा: पेट्रोल वाचवण्याच्या या भन्नाट टिप्स तुम्हाला माहिती आहेत का? )
मलेशियावर अवलंबून राहावे लागत आहे
महिन्याभरापूर्वी पामतेल 170 रुपये लीटर दराने विकले जात होते. आता पामतेलाच्या दरात तब्बल 25 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता पामतेल 195 रुपयांवर पोहोचले आहे. दोन वर्षांत पामतेलाच्या दरामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. इंडोनेशियाने निर्यातबंदी केल्यामुळे मलेशियातून आयात होणा-या तेलावर अवलंबून राहावे लागत आहे.
Join Our WhatsApp Community