खाद्यतेलाचे दर घसरले; ‘या’ आहेत नव्या किमती

सर्वसामान्यांनांना वाढत्या महागाईपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण खाद्यतेलाच्या दरात घसरण झाली आहे. जागतिक बाजारात घसरण झाल्याने खाद्यतेलाच्या किमती घसरल्या आहेत. भारतीय बाजारात भुईमुगाचे तेल वगळता इतर तेलाच्या दरात कपात झाली आहे.

जागतिक बाजारात घसरण झाल्याने, तेलाचे भाव घसरले आहेत. यामुळे तेल आयातदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खाद्यतेल उद्योजकही संकटात आहेत. तेल आयातदारांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. पामतेलाचे दर सुमारे 20 रुपयांनी घसरण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: केदार दिघेंविरोधात बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल )

एक लिटर तेलाची किंमत जाणून घ्या

  • मोहरीचे तेल- 7190 रुपये ते 7240 रुपये प्रति क्विंटल ( 42 टक्के स्थिती दर)
  • भुईमूग- 6870 रुपये ते 6995 रुपये प्रति क्विंटल
  • भुईमूग तेल मिल वितरण (गुजरात)- 16000 रुपये प्रति क्विंटल
  • भुईमूग साॅल्व्हेंट रिफाइंड तेल- 2670 रुपये ते 2860 रुपये प्रति टीन
  • मोहरीचे तेल (दादरी)- 14500 रुपये प्रति क्विंटल

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here