महागाईने सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे. आवश्यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. भाजीपाला, पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्य महागाईची झळ सोसत असताना, खाद्यतेलांच्या किंमतीत मात्र घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून खाद्यतेलाच्या दरात घट झाल्याने सामान्यांची फोडणी स्वस्त झाली आहे.
केंद्राने दिला दिलासा
आयात शुल्कात कपात केल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती गेल्या महिनाभरात 8 ते 10 रुपयांनी कमी झाल्या आहेत. तेलबियांचे वाढलेले देशांतर्गत उत्पादन आणि जागतिक बाजारपेठेतील मंदीचा कल यामुळे आगामी महिन्यांत खाद्यतेलाच्या किमती 3-4 रुपये प्रति किलोने आणखी कमी होऊ शकतात. असं इंडस्ट्री बॉडी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशने म्हटले आहे. जागतिक बाजारातील मंदीमुळे खाद्यतेलाच्या किमती आणखी 3-4 रुपयांनी कमी होऊ शकतात. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन या उद्योग संघटनेने ही माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात पाम, सोयाबीन आणि सूर्यफूलसारख्या सर्व तेलांच्या चढ्या किमतीमुळे भारतीय ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. एसईएने दिवाळीपूर्वी आपल्या सदस्यांना तेलाच्या किमती कमी करण्याचा सल्ला दिला होता.’ तसंच केंद्र सरकारने खाद्यतेलांवरील आयात शुल्कही कमी केल्याचे, एसईएचे अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी एका निवेदनात म्हटले आहे.
नियंत्रणात राहणार दर
आम्हाला हे सांगाताना आनंद होत आहे,की अनेक उपाययोजनांमुळे गेल्या 30 दिवसांत खाद्यतेलाच्या किमती सुमारे 8-10 रुपयांनी कमी झाल्या आहेत, असं चतुर्वेदी पुढे म्हणाले. ’ एसईएने सांगितले की, त्यांचे सदस्य ग्राहकांना कमी किमतीचा लाभ देण्यासाठी पावले उचलत आहेत. भारतात आता जवळपास 120 लाख टन सोयाबीनचे उत्पादन झाले आहे. तर 80 लाख टन शेंगदाण्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे भारतात खाद्य तेलाचे दर नियंत्रणात राहण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा :मोदींच्या हस्ते आज वाराणसीत काशी विश्वनाथ धामचे उद्घाटन! )
Join Our WhatsApp Community