Edible Oil Prices : फराळाच्या गोडव्याला महागाईची झळ; खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ

125
Edible Oil Prices : फराळाच्या गोडव्याला महागाईची झळ; खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय वाढ

दिवाळीच्या पवित्र सणात फराळाची महत्त्वाची भूमिका असते परंतु यंदा महागाईमुळे फराळाच्या किंमतीत लक्षणीय वाढ झालेली आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्यामुळे विविध फराळाच्या पदार्थांचे उत्पादन महागले आहे. त्यामुळे सामान्य जनतेला मोठा आर्थिक तडका बसणार आहे. (Edible Oil Prices)

खाद्यतेल विक्रेत्यांच्या मते गणेशोत्सव संपल्यानंतर खाद्यतेलाच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. सोयाबीन तेलाचे दर १,७५० रुपयांवरून २,१५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय, शेंगदाणा आणि सनफ्लॉवर तेलाच्या किंमतीही वाढल्या आहेत. यामुळे दिवाळीच्या फराळात लागणाऱ्या इतर वस्तू जसे की डाळ, साखर, आणि भाज्या यांची किंमत देखील वाढली आहे. (Edible Oil Prices)

(हेही वाचा – Drugs : मेफेड्रोनसह पाणीपुरी विक्रेत्याला मालवणीतून अटक)

महागाईमुळे यंदा गृहिणींना फराळ बनवण्यासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. चिवडा, शेव, चकली, लाडू, करंजी इत्यादींसाठी लागणारे साहित्य आता महाग झाले आहे. उदा. भाजणी चकली ४०० रुपये, तिखट शेव ३८० रुपये, बेसन लाडू ७५० रुपये प्रति किलो विकले जात आहेत. यामुळे अनेक गृहिणींचे दिवाळीचे बजेट कोलमडले आहे. (Edible Oil Prices)

सध्या चणाडाळ, जिरे, धणे, काजू आणि तेल यांच्यामध्ये दरवाढ झाली आहे. काजूच्या दरात १५० ते २०० रुपये किलो वाढ झाली आहे तर तेलाच्या किंमतीमध्ये प्रतिलिटर २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. (Edible Oil Prices)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.