रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून खाद्य तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. अमरावती जिल्ह्यात दुकानदारांनी खाद्य तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविल्याने नागरिकांना खाद्य तेलासाठी मोठी रक्कम मोजावी लागत आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
( हेही वाचा : महाराष्ट्रातील ‘या’ शहरात ‘सीएनजी’ पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग! )
तेलाच्या किमतीत वाढ
युद्धामुळे सध्या खाद्यतेलाचे भाव वाढले आहेत. आठ ते दहा दिवसांपूर्वी सोयाबीन तेलाचा पंधरा किलोचा डबा २ हजार १०० रूपये होता, तर आता त्याचे भाव २ हजार ५६० ते २ हजार ६०० रूपये झाले आहेत. सोयाबीनच्या १५ किलोच्या डब्यामागे आठ दिवसात ४६० ते ५०० रुपयाची वाढ झाली असल्याचे एका हॉटेल व्यावसायिकाने सांगितले. भाववाढीचा फटका सामान्य जनतेला होत असल्याचे दिसून येत आहे, तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळत आहे.
नागरिकांची मागणी
ग्राहकांना तेलाचे भाव वाढल्याचे रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम म्हणून खाद्यतेलाचे भाव वाढले असल्याचे दुकानदार ग्राहकांना सांगत असल्याने नेमके सोयाबीन व इतर खाद्य तेलाचे भाव काय आहेत ? याबाबत जिल्हा प्रशासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अधिकृत दरपत्रक जाहीर करण्याची मागणी नागरिक करीत आहे. युद्धाचा फायदा घेऊन जर खाद्य तेलाबाबत साठा करण्यात येऊन भाववाढ केली जात असेल तर जिल्हा प्रशासनाने योग्य ती दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.
Join Our WhatsApp Community