- ऋजुता लुकतुके
सणासुदीचा हंगाम डोळ्यासमोर असताना देशात खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prices) वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आताच मागच्या महिनाभरात मोहरीच्या तेलाच्या किंमतीत ९.१० टक्के तर पामतेलाच्या किमतीत १४.१६ टक्क्यांची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात आणि ऑनलाइन किराणा कंपन्यांच्या पोर्टलवर मोहरीच्या तेलाच्या किमती २६ टक्क्यांनी वाढल्या आहेत.
महिनाभरापूर्वी, ऑनलाइन किराणा पोर्टलवर मोहरीचे तेल २३९ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते. सध्या या तेलाची किंमत १७६ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या एका महिन्यात किंमती २६.६१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात खाद्यतेल म्हणून मोहरीचे तेल सर्वाधिक वापरले जाते. सरकारी आकडेही खाद्यतेलाच्या किमती (Edible Oil Prices) वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार विभागाच्या किमती संनियंत्रण विभागानुसार, मोहरीचे तेल जे एक महिन्यापूर्वी १३९.१९ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध होते, ते आता १५१.८५ रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. मोहरीचे तेल मुंबईत १८३ रुपये, दिल्लीत १६५ रुपये, कोलकात्यात १८१ रुपये, चेन्नईत १६७ रुपये आणि रांचीमध्ये १६३ रुपये किलो दराने उपलब्ध आहे.
(हेही वाचा – रेशीमबाग ते केशवकुंज; RSS चे मुख्यालय दिल्लीत?)
मोहरीच्या तेलाव्यतिरिक्त इतर खाद्यतेलाच्या दरातही (Edible Oil Prices) वाढ झाली आहे. एक महिन्यापूर्वी सूर्यफूल तेल ११९.३८ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते, आता ते १२९.८८ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. महिन्याभरापूर्वी पामतेल ९८.२८ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होते, मात्र आता ते ११२.२ रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहे. सोया तेलाचे भावही एका महिन्यात ११७.४५ रुपयांवरून १२७.६२ रुपये प्रतिकिलो झाले आहेत.
खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ करण्यात आली असून, त्यामुळे खाद्यतेलाची आयात महाग झाली आहे. त्यामुळं दरात वाढ झाली आहे. सरकारने क्रूड सोयाबीन तेल, कच्चे पाम तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क शून्यावरुन २० टक्के आणि खाद्यतेलांवरील आयात शुल्क १२.५ टक्क्यांवरून ३२.५ टक्के केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पामतेलापासून सोया, मोहरीपर्यंत सर्व प्रकारची खाद्यतेल (Edible Oil Prices) महाग झाली आहे. देशांतर्गत शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ केली आहे. दरम्यान, सध्या देशात सणासुदीचा हंगाम सुरु झाला आहे. या काळातच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community