देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसाठी पुढील काळात मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तब्बल ३.६० कोटी लिटर क्षमतेच्या तीन टाक्या विकसित केल्या जाणार आहेत. मुंबई बंदर प्राधिकरणांतर्गत मॅलेट बंदरावर (Mallet Port) ही उभारणी होणार आहे. (Edible oil tanks)
महामुंबईतील सव्वा दोन कोटी लोकसंख्येची दररोजची खाद्यतेल मागणी जवळपास ४० लाख लिटर आहे. ही मागणी पूर्ण करणारे मोठे साठवणूक केंद्र किंवा तळ मुंबईत नाही. शिवाय येत्या काळात ही मागणी वाढती असेल. हे ध्यानात घेऊन प्राधिकरणाने मॅलेट बंदरावर या टाक्या बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
‘बिगर धोकादायक’ साठा
या टाक्या सर्व प्रकारच्या ‘बिगर धोकादायक’ द्रवसाठ्यांसाठी असतील. खाद्यतेलासह दूध, रस यांचाही समावेश होऊ शकेल. मात्र मुंबईची सध्याची गरज बघता प्रामुख्याने खाद्यतेल साठ्यासाठी या टाक्या असतील, असे प्राधिकरणातील सूत्रांनी सांगितले.
(हेही वाचा – NEET-UG Counsellingपुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित, कारण काय ? जाणून घ्या…)
काही वर्षे आधी माझगाव येथील मॅलेट बंदरात (Mallet port at Mazgaon) ११ हजार ३०० चौरस मीटर (२.७९ एकर) क्षेत्रफळावर इंधन टाक्या होत्या. मात्र माहुल येथील इंधन साठ्याच्या व्यवस्थेनंतर त्या बंद पडल्या. त्यामुळे ती जागा आणि टाक्या मोकळ्या आहेत. या जागेचा सुयोग्य वापर करण्यासाठी तेथे अत्याधुनिक आणि साठवणूक टाक्या किंवा द्रवयुक्त पदार्थ साठवणुकीची जागा विकसित करण्यासाठी प्राधिकरणाने निविदा काढली आहे. या टाक्या उभ्या करण्याचे काम संबंधित कंत्राटदाराल तीन वर्षात पूर्ण कारायचे आहे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.
(हेही वाचा – Manipur Religious War: मणिपुरात धार्मिक स्थळावर गोळीबार; केंद्रीय दलाचे पथक तैनात)
या जागेवर तीन टाक्या उभ्या करता येतील. प्रत्येक टाकीची क्षमता प्रत्येकी १२ हजार किलो लिटर (१.२० कोटी लिटर) असेल. त्यानुसार ३.६० कोटी लिटर तेल किंवा इंधन साठवणूक करता येणार आहे. संबंधित कंत्राटदाराला ही जागा ३० वर्षांच्या भाडेपट्टीवर दिली जाणार आहे. त्यासाठीच किमान दर दरवर्षी ६८०३ रुपये प्रति मीटर असा असेल.
हेही पाहा –