Education fee hike : इंग्रजी शाळांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांची कोंडी

91
Education fee hike : इंग्रजी शाळांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांची कोंडी
Education fee hike : इंग्रजी शाळांच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या शैक्षणिक शुल्कामुळे पालकांची कोंडी

शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. मात्र आजकाल मुलांना शिक्षण देणं हे खर्चिक होत चाललं आहे ही सध्याची वस्तुस्थिती आहे. इंग्रजी माध्यमातल्या शाळांची वार्षिक फी खूप जास्त आहे. याबाबत चर्चाही होत असते. पालक आवाजही उठवत असतात. पण या शाळांची फी काही कमी झाल्याचे चित्र दिसत नाहीये. दरम्यान, पाल्य तीन वर्षाचा झाल्यावर त्याला प्राथमिक शाळेत टाकण्याची घाई ही पालकांनाच असते. मात्र, सध्या प्री-प्रायमरीपासून (Pre-Primary School) सुरू होणारा शैक्षणिक खर्च उच्च शिक्षणापर्यंत परवडेनासा झाला आहे. अगदी पहिलीपासून दहावीपर्यंत विद्यार्थ्यांचा शाळेचा खर्च हा अव्वाच्या सव्वा येतो. अशी तक्रार पालकवर्ग करत आहेत. (Education fee hike)

विनाअनुदानित, अनुदानित मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या (English medium fee hike) शाळांमध्ये पालकांना कमी-अधिक प्रमाणात शैक्षणिक खर्च येत असला, तरी इंग्रजी शाळांत प्रत्येक वर्षी वाढणारे शुल्क सर्वसामान्यांना परवडणारे नाही. दरम्यान पालिकेच्या शाळांमध्ये मोफत शिक्षण असले, तरी इंग्रजी शाळांतून शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. तर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad School) काही शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याचे कारण देत पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेताना दिसतात. 

(हेही वाचा – MSRTC ची यंदाच्या दिवाळीत हंगामी भाडेवाढ नाही)  

इंग्रजी शाळांची वार्षिक फी किती? 

इयत्ता पहिली 

४० ते ५० हजार 

इयत्ता दुसरी 

४० ते ५५ हजार 

इयत्ता तिसरी 

५५  ते ६० हजार 

इयत्ता चौथी ते दहावी

७० हजार ते १ लाख

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.