आसाममध्ये हिंदूंच्या घरवापसीला वेग; ११ कुटुंबातील ४३ जणांचा हिंदू धर्मात पुनर्प्रवेश

सध्या आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राज्यात धर्मांतरित हिंदू धर्मियांना पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश देण्याचा धडाका सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी, २७ फेब्रुवारी रोजी ११ कुटुंबातील ४३ जणांची हिंदू धर्मात घरवापसी करण्यात आली. या अकरा कुटुंबीयांना यापूर्वी ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित करण्यात आले होते. जगीरोड (मारीगांव) येथे हा कार्यक्रम करण्यात आला.

या कार्यक्रमाचे संयोजक जर्सिंग बोरोडोलोई यांनी माहिती देताना सांगितले की, आम्ही सुरू केलेल्या घरवापसी अभियानांतर्गत दोन्ही गावांतील लोक, आपल्या मूळ हिंदू धर्मात परत आले आहेत. गावातील या सर्व ११ कुटुंबीयांतील ४३ सदस्यांचे धर्म परिवर्तन निर्वाचन क्षेत्र जगीरोड (मारीगांव) येथे करण्यात आले. त्यानंतर, आसाममधील ११ कुटुंबातील या सर्वच सदस्यांची घरवापसी चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा हे सातत्याने हिंदूंच्या घरवापसीसंदर्भात विधाने  करत आहेत. इसाई आणि मुस्लीम धर्मांतरणाला अनुसरून मुख्यमंत्री सरमा ठाम असतात. भाजपा आमदार पियुष हजारिका यांनी या धर्मांतरणाबाबत दावा केला की, मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्या सरकारच्या नितीमुळेच इसाई धर्मांत गेलेल्या हिंदू कुटुंबीयांची घरवापसी केली आहे.

(हेही वाचा मुंबईत आत्मघाती हल्ल्याचा कट?; संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here