एसटीच्या ताफ्यात लवकरच खासगी बस!

एसटी पूर्ववत सुरु झाल्यानंतर, आता एसटी प्रवाशांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता, एसटीच्या ताफ्यात खासगी बस आणण्याचा विचार सुरु आहे.

एसटीच्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता, नवीन बसेसची खरेदी अनिवार्य आहे, मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन बसेसची खरेदीच झाली नसून, आता नवीन बसेस सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

( हेही वाचा: अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत बदल )

भाडेतत्वावर बस घेतल्या जाणार 

भविष्यात राज्यभरात एकूण हायस्पीड डिझेलच्या 44 सीटर असलेल्या 500 बसेस भाडेतत्वावर राज्यभरात आणण्याचा प्रयत्न असून पुणे, सांगली विभागासाठी 180 बसेस पुरवण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. सध्या लातूर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, धुळे या विभागासाठी सुमारे 320 बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. तर पुणे, सांगलीसाठी नव्याने 180 बस भाडेतत्वावर घेण्यात येणार आहेत. त्यासाठी काढलेली निविदा 30 जूनपर्यंत भरता येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here