- सचिन धानजी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या स्मशानभूमीमध्ये (Cemeteries) आता पर्यावरणाचा समतोल राखण्यावर महापालिकेने भर दिला असून सध्या जास्त लाकडाचा वापर करून रचल्या जाणाऱ्या चितांऐवजी आता कमीत कमी लाकडाचा वापर करून पर्यावरणाची हानी कशी होईल, याच विचाराने आता चिता रचल्या जाणार आहेत. मुंबईतील ९ स्मशानभूमींमध्ये याचा वापर केला जाणार आहे. या नव्या पद्धतीच्या चितांमध्ये पॅलेट आणि ब्रिकेटचा इंधन म्हणून वापर केला जाणार आहे. यामुळे अंत्यसंस्काराचा कालावधी कमी होऊन वायू प्रदूषणही कमी होणार आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये (Cemeteries) मृतदेहांवर पारंपारिकपणे अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडी चिता पद्धती, विद्युत दाहिनी व गॅस दाहिनी पद्धतीचा वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर केला जातो. पर्यावरणाची हानी कमी करून चिताचा वापर अंत्यसंस्कारासाठी केल्यास, त्यामुळे इंधनाची बचत होते. शिवाय वायू प्रदूषणही कमी होते.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : भाजप+ १५०; काँग्रेस १००+, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचेही ८० उमेदवार घोषित)
जुलै २०२० पासून महापालिकेने या पद्धतीचा वापर प्रायोगिक तत्वावर महापालिकेच्या शीव स्मशानभूमीमध्ये केला होता. या यशस्वी प्रयोगानंतर आता ९ स्मशानभूमींमध्ये (Cemeteries) याचा वापर केला जात आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने विविध करांपोटी सुमारे २९ कोटी रुपये खर्च केला जाणार असून प्रत्येक स्मशानभूमीतील अशा चितांसाठी सरासरी ९ कोटींहून अधिक खर्च होणार आहे. या कामांसाठी महापालिकेच्यावतीने ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड केली आहे.
महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीमध्ये विद्युत तथा पीएनजीवर आधारित दाहिन्या असून जिथे या दाहिन्या नाहीत, तिथे आता पर्यावरणास अनुकूल अशा चिता बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पारंपारिक चिता ऐवजी विद्युत किंवा पीएनजीवर आधारित स्मशानभूमीत (Cemeteries) चितांचा वापर अंत्यसंस्कार करता करणे आवश्यक आहे. याच खऱ्या पर्यावरणपूरक स्मशानभूमी आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्युत आणि पीएनजीवर आधारित दाहिनी असलेल्या स्मशानभूमीचा वापर करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येते.
(हेही वाचा – आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’)
काय आहे पारंपारिक आणि पर्यावरणास अनुकूल चितांमधील फरक
पारंपारिक चिता : अंत्यसंस्कारासाठी प्रती शव सुमारे ३५० ते ४०० किलो लाकडाचा वापर
पर्यावरणास अनुकूल चिता : प्रती शव सुमारे १०० ते १२५ किलो लाकडाचा वापर, पॅलेट व ब्रिकेटचा इंधन म्हणून वापर
पारंपारिक चिता : या पद्धतीमुळे वायू प्रदूषण होते, त्यामुळे पर्यावरणाला घातक
पर्यावरणास अनुकूल चिता : पर्यावरण पुरक पद्धतीमुळे जवळजवळ प्रदूषणमुक्त
पारंपारिक चिता : अंत्यसंस्कारासाठी प्रती शव ४ तास
पर्यावरणास अनुकूल चिता : प्रती शव दीड तास
पारंपारिक चिता : कार्बन उत्सर्जन उच्च सुमारे ६०० किलो/दहन
पर्यावरणास अनुकूल चिता : कार्बन उत्सर्जन कमी १६० किलो/दहन
कोणत्या स्मशानभूमींमध्ये होणार आहे
- भोईवाडा स्मशानभूमी
- रे रोड वैंकुठधाम स्मशानभूमी
- वडाळा गोवारी स्मशानभूमी
- विक्रोळी टागोर नगर स्मशानभूमी
- गोवंडी देवनार कॉलनी स्मशानभूमी
- चेंबूर पोस्टल कॉलनी अमरधाम स्मशानभूमी
- बोरीवली बाभई स्मशानभूमी
- ओशिवरा स्मशानभूमी
- गोरेगाव शिवधाम स्मशानभूमी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community