राज्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. शनिवार-रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ईद आणि मंगळवारी श्री गणेश विसर्जनाची सुट्टी असल्याने नोकरदार सुखावले होते. परंतु या काळात रस्त्यावर होणारी प्रचंड गर्दी पहाता कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – आरक्षण संपवण्याची काँग्रेसची सुप्त इच्छा उघड झाली; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल)
16 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण होणार आहे. या दिवशी जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी घेतला आहे.
त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर या भागात देण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने , जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community