पॅरिसमधील Eiffel Tower ला भीषण आग; १२०० पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेले

84
पॅरिसमधील Eiffel Tower ला भीषण आग; १२०० पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेले
पॅरिसमधील Eiffel Tower ला भीषण आग; १२०० पर्यटकांना सुरक्षितस्थळी नेले

फ्रान्सची (France) राजधानी पॅरिसमधील (Paris) आयफेल टॉवरला (Eiffel Tower )आग लागल्याची घटना घडली आहे. १२०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली आहे. लिफ्टमध्ये आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण टॉवर रिकामा करावा लागला. ख्रिसमस (Christmas) असल्याने टॉवरवर मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होती, मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या आयफेल टॉवर बंद करण्यात आला असून घटनेची चौकशी सुरू आहे.

१२०० लोकांना सुरक्षित स्थळी हालवले

ख्रिसमसच्या (Christmas) पूर्वसंध्येला आयफेल टॉवरला(Eiffel Tower ) लागलेली आग ही एक मोठी घटना मानली जात आहे. कारण मोठ्या संख्येने पर्यटक ख्रिसमस साजरा करण्यासाठी येथे येतात. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरला आग लागल्याच्या वृत्ताने सर्वत्र एकच खळबळ उडाली. सध्या १२०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

टॉवरच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग

मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या (Christmas) पूर्वसंध्येला पॅरिसमध्ये आयफेल टॉवर (Eiffel Tower ) येथे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागल्यानंतर आयफेल टॉवर (Eiffel Tower) रिकामा करण्यात आला. आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले की, १२०० लोकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आपत्कालीन सेवा तातडीने तैनात करण्यात आल्या.

आयफेल टॉवर, जगातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक

आयफेल टॉवर (Eiffel Tower )हे पॅरिसमधील (Paris) सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे आणि पर्यटकांसाठी जगातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज १५ हजार ते २५ हजार पर्यटक आयफेल टॉवरला भेट देतात. यावरून ख्रिसमसच्या (Christmas) पहिल्या संध्याकाळी लोक किती उत्साहात इथे पोहोचले असतील याचा अंदाज लावता येतो. याशिवाय पर्यटकांची संख्याही बऱ्यापैकी असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.(Eiffel Tower )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.