दक्षिण आफ्रिका आणि नामिबियामधून कुनो नॅशनल पार्क (KNP) मध्ये आणलेल्या २० चित्त्यांपैकी एका वर्षात ४० टक्के चित्यांचे मृत्यू होणे चांगली बाब नाही. गरज भासल्यास त्यांना अनुकूल वातावरणात हलवावे आणि त्याचा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवू नये, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयांची न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी केले.
एकूण एका वर्षात येथे आणलेल्या एकूण २० पैकी आठ चित्ते मरण पावले, हे चांगले चित्र नाही. गेल्या आठवड्यातच दोघांचा मृत्यू झाला. तुम्ही इतर शक्यतांकडे लक्ष दिले पाहिजे, जसे की त्यांना इतर अभयारण्यांमध्ये स्थानांतरीत करा, तुम्ही हा प्रतिष्ठेचा मुद्दा का बनवत आहात?, असा सवाल न्यायालयाने केला. न्यायालयाने अधिकार्यांना चित्त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरवत या परिस्थितीबद्दल प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी १ ऑगस्ट रोजी ठेवली.
(हेही वाचा Chandrayaan 3 : चांद्रयान ३ कुठवर पोहचले? चंद्राच्या दिशेने कधी प्रवास सुरु करणार? )
१४ जुलै रोजी, दक्षिण आफ्रिकेतून स्थलांतरित झालेल्या सूरज नावाच्या नर चित्ताचा KNP येथे मृत्यू झाला. यानंतर, मार्चपासून श्योपूर जिल्ह्यातील उद्यानात आणलेल्या चित्त्यांनंतर मृत चित्यांची एकूण संख्या आठ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून केएनपीमध्ये आणलेल्या तेजस या नर चित्ताचा ११ जुलै रोजी मृत्यू झाला होता.
Join Our WhatsApp Community