गोवंडीत गोवरमुळे अजून एका बाळाचा बळी, मृतांची संख्या १३वर

गोवरच्या वाढत्या साथीमध्ये गोवंडीत आता आठव्या बाळाचा बळी गेला. गोवर प्रतिबंधासाठी आवश्यक ९ महिने पूर्ण होण्यासाठी एक महिना राहिलेला असताना मुलाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ४ दिवसात पूरळ आल्याने ८ महिन्याच्या या बालकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता केंद्राने सुचवल्याप्रमाणे पालिका अतिरिक्त गोवरप्रतिबंधात्मक लसीची मात्रा देणार का, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत कळवण्यात आले नाही.

( हेही वाचा : मालाडमधील अनधिकृत भरणी प्रकरणी महापालिकेने उचलले ‘हे’ पाऊल)

या बाळाला जन्मापासून सर्व लस देण्यात आल्या होत्या. ताप आणि पूरळ आल्याने रविवारी बाळाला श्वसनाचाही त्रास होऊ लागला. बाळाच्या पालकांनी त्याला रविवारीच पालिका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. बाळाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत नसल्याने त्याला विशेष रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यापासून बालकाला व्हेंटिलेटरवरच ठेवण्यात आले. बाळाची प्रकृती खालावतच होती. अखेरिस गुरुवारी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी बाळाचा मृत्यू झाला. बाळाला गोवरच्या बाधेसह श्वसनाशी संबंधित न्यूमिनोया झाला होता. त्याच्या शरीरातील अवयव निकामी झाले, असे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट करण्यात आले.

नव्या १९ रुग्णांचे निदान

दक्षिण मुंबई तसेच पूर्व उपनगरात आता गोवरची साथ पसरु लागली आहे. डी विभागासह, ए आणि आता बी वॉर्डात तसेच पूर्व उपनगरातील टी, एस, एन विभागांतही गोवरचे रुग्ण आढळले आहेत.

विभागनिहाय गुरुवारी नोंदवलेल्या गोवरबाधित रुग्णांची संख्या

शहर – सी (१), डी (१), ई (२), जी-दक्षिण (२)

उपनगर – के (पश्चिम)- (२), पी-दक्षिण (१)

पूर्व उपनगर – एल (२),एस-पूर्व (२), एम-पश्चिम (३), एन(१), एस(१), टी(१)

आतापर्यंत मुंबईत आढळून आलेल्या गोवरबाधित रुग्णांची संख्या – २५२

निश्चित गोवरबाधित रुग्णांची संख्या ८, मुंबईबाहेरील मृत्यूची संख्या – ३, संशयित मृत्यू – २

मुंबईतील ताप आणि पूरळचे आतापर्यंत आढळून आलेले रुग्ण – ३ हजार ६९५

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here