Ladki Bahin Yojana : सव्वाआठ लाख लाडक्या बहिणींनी घेतला २ सरकारी योजनांचा लाभ

84

महाराष्ट्र सरकारने आणलेल्या लोकप्रिय लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) एका वेळी सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेता येईल, असा नियम आहे. असे असूनही ‘नमो शेतकरी योजने’अंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही.

(हेही वाचा – माथाडी कामगार कायद्यात सुधारणा करणार; कामगारमंत्री Aakash fundkar यांचे आश्वासन)

नमो शेतकरी (namo shetkari yojana) व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ सव्वाआठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाली आहे. त्यामुळे या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे.

सव्वाआठ लाख महिला नमो शेतकरी योजनेत वर्षभरात १२ हजार रुपये मिळवितात आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेतून देखील १८ हजार रुपये वर्षाकाठी मिळवतात, म्हणजे त्यांना वर्षाकाठी एकूण ३० हजार रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

डबल लाभ द्यायचा नाही, असे ठरविले, तर वार्षिक १४०० कोटींचा अतिरिक्त बोजा कमी होईल. या दोन्ही योजनांत २,२०० सरकारी क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचेही आढळले आहे. यातील १,२०० कर्मचारी हे विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत. (Ladki Bahin Yojana)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.