सरदार पटेल यांचा पुतळा उभा राहिला; पण छत्रपतींचा अजून उभा राहीला नाही. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची घोषणा झाली, तेव्हा आम्हाला आनंद झाला होता. देशाच्या आर्थिक राजधानीत शिवाजी महाराजांच्या कीर्तीला साजेसे स्मारक होणे, ही अभिमानाची बाब होती. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शिवस्मारकाचं जलपूजन केले. आता आठ वर्ष उलटल्यानंतरही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभा राहिला पण महाराष्ट्रात अजून छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा राहिला नाही, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (SambhajiRaej) यांनी केले. ते रविवार, ६ ऑक्टोबर रोजी गेट वे ऑफ इंडिया परिसरातून बोलत होते.
(हेही वाचा – Nandurbar : नंदुरबारमध्ये भरधाव ट्रक मेंढ्यांच्या कळपात शिरला आणि…)
संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधण्याची मोहीम आयोजित करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, पंतप्रधान मोदी यांनी अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं जलपूजन केल्यानंतर मी एक-दोन वर्षे थांबलो होतो. त्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि त्यानंतरचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवस्मारकाबाबत विचारणा केली.
शिवस्मारक बांधण्यासाठी समिती स्थापन होऊन काम का सुरु झाले नाही, असे मी विचारले. त्यावर मला सांगण्यात आले की, अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या सगळ्या परवानग्या मिळालेल्या नाहीत. केंद्रात तुमचे सरकार आहे, राज्यात तुमचे सरकार आहे. मग हा प्रश्न मार्गा का लागत नाही, असा सवाल संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी उपस्थित केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community