Eknath Khadse : एकनाथ खडसेंना छोटा शकील गँगकडून धमकी, गुन्हा दाखल

वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून Eknath Khadse यांना धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग (Dawood Chota Shakeel Gang) तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

188
तीन महिने उलटूनही भाजपा प्रवेश न झाल्याने Eknath Khadse द्विधा मनस्थितीत?

ज्येष्ठ नेते आणि शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आले आहेत. छोटा शकील गँगकडून ही धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या वतीने मुक्ताईनगर (Muktainagar) पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ पोस्ट हटवल्या; तरीही ‘एक्स’ला निवडणूक आयोगाचा आदेश अमान्य)

दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे

१५ आणि १६ एप्रिलला हे फोन आल्याची माहिती खडसेंनी तक्रारीत दिली आहे. प्रकरणाचा अधिक तपास स्थानिक पोलिस करत आहेत. एकनाथ खडसे यांनी सांगितले की, “वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून त्यांना फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग (Dawood Chota Shakeel Gang) तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. दुसऱ्या वेळी फोन आला, तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही तुम्हाला सांगितलं, तरीदेखील तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत.

तब्बल ४ ते ५ वेळा खडसेंना फोन आला आहे. एक फोन अमेरिकेवरून आला आहे, तर एक लखनऊ येथून आल्याची माहिती आहे. याआधी देखील त्यांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत. धमकीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. धमकीचे फोन आल्यानंतर खडसे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) प्रचारात अनेक नेते व्यस्त असतांना ही धमकी मिळाली आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. अशात ही धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.