महालक्ष्मी रेसकोर्सवर (Mahalakshmi Race Course) आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क (International Central Theme Park) विकसित करण्यात येणार आहे. परंतु, याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल करण्यात आली. या थीम पार्कबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही, असा दावा राज्य सरकारने बुधवारी उच्च न्यायालयात केला होता.
(हेही वाचा – Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत)
तर, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दैनिक लोकसत्ताच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त साधलेल्या संवादात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सेंट्रल थीम पार्क होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
“लालफितीमध्ये कामं अडकणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असतो. त्यामुळे एकल खिडकी योजना आपण चालू केली. मध्ये युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक घडामोडींचे परिणाम प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अनेकांना भोगावे लागतात. पण या सर्व गोष्टी डोक्यात ठेवून नियोजन केलं जातं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community