एमएमआरडीए आणि वर्ल्ड स्मार्ट सिटीज फोरम युके यांच्यात दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. एमएमआर परिसरात तंत्रज्ञानधिष्ठित, सर्वसमावेशक अशा स्मार्ट सिटीच्या निर्मितीसाठी हा करार दिशादर्शक असणार आहे.
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून औद्योगिक विकासासाठी पूरक वातावरण तयार होईल आणि शाश्वत स्वरुपाची जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यात मदत होणार आहे. या सामंजस्य करारान्वये, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हाताळणीत पारंगत वर्ल्ड स्मार्ट सिटीज फोरमचे कुशल तंत्रज्ञ स्मार्ट सिटीच्या नियोजनावेळी एमएमआरडीएला मदत करण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Tata Steel Job Cut : टाटा स्टील इंग्लंडमध्ये २,८०० जणांची नोकर कपात करणार)
या सामंजस्य कराराअंतर्गत परस्पर सहकार्यातून मास्टर प्लॅनची आखणी करण्यात येईल. जेणेकरून एमएमआर प्रदेश ऊर्जा आघाडीवर स्वावलंबी असेल, अशी पुनर्रचना करण्यात येईल. तंत्रज्ञानाधिष्ठित स्मार्ट होम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची उभारणी करण्यात येईल. या करारामुळे दोन्ही यंत्रणांदरम्यान ज्ञानाची देवाणघेवाण होईल.
आर्थिक प्रगतीला चालना
डब्ल्यूएससीएफने प्रमाणित केलेली मानकं आता एमएमआरडीएच्या कार्यप्रणालीचा भाग असतील. यातूनच स्मार्ट ग्रोथ सेंटरचं स्वप्न पूर्ण होईल. या भागीदारीमुळे संलग्न भागात जागतिक गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक प्रगतीला चालना मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले.
जागितक मानकं…आमच्या कार्यपद्धतीचा भाग
मुंबई ट्रान्सहार्बर लिंकच्या उद्घाटनानंतर हा भाग प्रचंड विकसित केला जाऊ शकतो हे स्पष्ट झालं आहे. या ऐतिहासिक भागीदारीतून डब्ल्यूएससीएफचा अनुभव, जागतिक मानकं हे आमच्या कार्यपद्धतीचा भाग होईल. डिजिटल सक्षमीकरण, एमएमआर भागाचा शाश्वत विकास यासाठी हा सामंजस्य करार चालना देणारा ठरेल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community