जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे आज तिसऱ्या दिवशीही पडसाद उमटत आहेत. राज्यात तणावाचे वातावरण आहे. मराठा आरक्षणाबाबत स्वस्थ बसणार नाही. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची न्यायालयीन चौकशी केली जाईल, अशी घोषणा त्यांनी आज बुलढाणा येथे बोलताना केली.
त्यानंतर ते म्हणाले की, आंदोलकांवर लाठीमार केल्याप्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. डीवायएसपीलाही जिल्ह्यातून बाहेर पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषींना निलंबित करण्यात येणार आहे. यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
(हेही वाचा –G20 Conference : परिषदेच्या तयारीला वेग; नेत्र विमानाच्या माध्यमातून दिल्लीच्या हवाई क्षेत्रावर नजर )
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठा समाजाचे मूक मोर्चे निघत होते. हे मोर्चे शांततेत आणि शिस्तबद्ध निघत होते. जालन्यात दुर्दैवी घटना घडली. त्याचे मला आणि सर्वांनाच दु:ख आहे. आंदोलनात दगडफेक कुणी केली याचा शोध घेतला जाईल तसेच जेव्हापासून मी मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून आज सरकार जाणार, उद्या जाणार असं चालू आहे. जनता माझ्याबरोबर आहे, तोपर्यंत कोणीही माझा बाल बाका करू शकत नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
Join Our WhatsApp Community