Eknath Shinde: गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी…मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया, म्हणाले…

625
Eknath Shinde: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करून देणार
Eknath Shinde: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारी यात्रोत्सवासाठी कायमस्वरुपी निधी उपलब्ध करून देणार

उल्हासनगरमधील हिललाईन पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Kalyan East Division City Chief Mahesh Gaikwad) जखमी झाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये जाऊन कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी शुक्रवारी घडलेल्या घटनेची त्यांनी पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली. झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : इंग्लंड विरुद्धच्या द्विशतकानंतर यशस्वी सचिन, विनोद आणि रवी शास्त्रीच्या पंक्तीत)

कसा घडला प्रसंग…
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनामध्ये शुक्रवारी रात्री आमदार गणपत गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड हे दोघे बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश यांच्यात बोलाचाली झाली. यावरून संतप्त झालेल्या आमदार गायकवाड यांनी महेश यांच्यावर गोळीबार केला. यात महेश आणि त्यांचा सहकारी राहुल पाटील हे दोघे जखमी झाले. या दोघांना ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्युपिटर रुग्णालय प्रशासनाने महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर चिंताजनक तर राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.