जी-20 शिखर परिषदेसाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी काल दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद मोदींचे तोंडभरून कौतुक केले आहे तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या गाला डिनर कार्यक्रमालाही एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, जी-20 देशांची 18वी शिखर परिषद दिल्लीत पार पडत आहे. या परिषदेसाठी जगभरातील राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना आमंत्रण देण्यात आले आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मीदेखील या परिषदेत सहभागी होत आहे. याचबरोबर आपल्याला जी-20 परिषदेचे अध्यक्षपद मिळणं ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे.
(हेही वाचा – Rain Update: कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर आज ‘येलो अलर्ट’)
देशाचा सर्वांगीण विकास, चंद्रयानाचे यश आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणा, यामुळे भारताचा जगभरात लौकिक वाढत आहे. आपली अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आहे. गेल्या 9 वर्षांच्या काळात अनेक विकासाची कामे देशात झाली आहेत, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीदेखील भेट घेतली. या भेटीचा फोटो एकनाथ शिंदे यांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासोबत पर्यावरणमंत्री अश्विनीकुमार चौबे हेदेखील दिसून येत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community