Irshalwadi landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेत 20 जणांचा मृत्यू; विधानसभेत मुख्यमंत्री शिंदे यांचे निवेदन 

131

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीरायगडच्या इर्शाळवाडीत दरड कोसळण्याच्या घटनेवर विधानसभेत निवेदन सादर केले. इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 20 वर पोहोचला आहे. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेत आतापर्यंत 119 जणांना वाचवण्यात यश आले आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री गिरीश महाजन आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मंत्री गिरीश महाजनांचे विशेष काम आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या ठिकाणी राहून विशेष लक्ष देत आढावा घेतला. या सर्वांमुळे बचाव कार्यामध्ये गती आली. आजही या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून लोकांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटना घडल्यापासून दोन तासांच्या आत आपली यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचली असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा Heavy Rain : हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द लोकल बंद; मध्य रेल्वेही विस्कळीत)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या यंत्रणेसोबत स्वयंसेवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बचत कार्यात मदत केली. नैसर्गिक आपत्ती असल्याने राज्य सरकारपुढे काही मर्यादा आहेत. सतत पडणारा पाऊस आणि चिखल, धुक्यांमुळे बचावकार्यात अडथळे येत होते. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी त्या ठिकाणी जाऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. त्या ठिकाणी अजून काही लोक अडकल्याची शक्यता आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येत आहे.

कुटुंबाचे पूनर्वसन करणार

जीवितहानी टाळण्यासाठी तिथे राहणाऱ्या कुटुंबाचे पूनर्वसन करणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्यासाठी जागा हेरण्यात आल्या आहेत. तिथल्या लोकांचे स्थलांतर करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. इर्शाळवाडीत एनडीआरएफएचे युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांनी राजकारण दूर सारुन सहकार्य केल्याचे शिंदे यांनी निवेदनात सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.