
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) संभलमध्ये (Sambhal) वक्फ विधेयकाचे (Waqf Amendment Bill ) समर्थन करणाऱ्या वृद्ध मुस्लिमाला (Muslim) मारहाण करण्यात आली आहे. वक्फ विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल वृद्ध जाहिद सैफी (Zahid Saifi) यांना धर्मांध कट्टरपंथींनी घेरले आणि त्यांना मारहाण केली. धर्मांध मुस्लिम कट्टरपंथींनी जाहिद सैफीला म्हणाले की, तु इस्लाम सोडून हिंदू (Hindu) झाला आहेस का? (Waqf Amendment Bill )
( हेही वाचा : Motorola Edge 60 Fusion भारतात लाँच ; खरेदी करण्यापूर्वी जाणुन घ्या सर्व काही !)
पीडित जाहिद सैफी (Zahid Saifi) हे उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अशफाक सैफी यांचा मेहुणा आहे. जाहिद सैफी हा गुन्नौर कोतवाली येथील रहिवासी आहे. ते दि. ३ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता शहरातील अबू बकर मशिदीत (Abu Bakr Mosque) नमाज अदा करण्यासाठी गेले होते. (Waqf Amendment Bill)
नमाज अदा केल्यानंतर जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांनी स्थानिक लोकांशी वक्फ विधेयकावर चर्चा केली. यावेळी काही लोकांनी हे विधेयक चुकीचे असल्याचे म्हटले परंतु जाहिद सैफी (Zahid Saifi) यांनी त्यांचा विरोध केला आणि विधेयकाचे समर्थन केले आणि ते मुस्लिमांच्या हिताचे असल्याचे सांगितले. (Waqf Amendment Bill)
यानंतर घटनास्थळी उभे असलेल्या रिजवान, नौशाद आणि शोएबसह अनेकांनी जाहिद सैफीवर काठ्यांनी हल्ला केला. त्यांनी धारदार शस्त्राने हल्ला केला आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत जाहिद सैफी (Zahid Saifi) गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. (Waqf Amendment Bill)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community