- प्रतिनिधी
नव्या मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याच्या उद्देशातून केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पदासाठी विचार होणाऱ्या नावांच्या छाननीसाठी सरकारने केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली शोध समिती स्थापन केली आहे. (Election Commission)
(हेही वाचा – Drugs Seized : मुंबईत 22 कोटी रुपयांचे 2.2 किलो कोकेन जप्त)
विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ १८ फेब्रुवारीला समाप्त होईल. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करावी लागणार आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगातील सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्ताला मुख्य निवडणूक आयुक्तपदी बढती दिली जायची. मात्र, मागील वर्षी मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीविषयी नवा कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार, शोध समिती सचिव दर्जाच्या ५ अधिकाऱ्यांची नावे निश्चित करते. त्या नावांवर विचार करून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील निवड समिती मुख्य आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करते. (Election Commission)
(हेही वाचा – Donald Trump यांचा एक निर्णय आणि बांगलादेशनंतर आता पाकिस्तानला मोठा झटका)
निवड समितीच्या इतर सदस्यांमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या एका केंद्रीय मंत्र्याचा समावेश असतो. दरम्यान, मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील शोध समितीमध्ये आणखी २ सदस्य आहेत. त्यामध्ये अर्थ सचिव आणि कार्मिक विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. (Election Commission)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community