Election Commission ला नकोत महापालिकेचे अशिक्षित कामगार

103
Election Commission ला नकोत महापालिकेचे अशिक्षित कामगार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने (Election Commission) आपल्या हवा असलेला आणि वर्णी लावलेल्या कामगार, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामांसाठी नियुक्त केले. यामध्ये चतुर्थश्रेणीतील कामगारांचाही आवश्यकता नसताना या कामांसाठी ऑर्डर काढल्या गेल्या. आता मात्र त्यातील अशिक्षित कामगार निवडणूक आयोगाला नकोसे झालेले आहेत. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असलेले जे कर्मचारी अशिक्षित असतील त्या कर्मचाऱ्यांऐवजी सुशिक्षित कर्मचारी निवडणूक कर्तव्यार्थ पाठविण्याची मागणी निवडणूक आयोगाने केल्याची माहिती मिळत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या कामाकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांना आठवड्यातून ०३ दिवस म्हणजेच गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपलब्ध करून देण्याबाबत व उर्वरित ०३ दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी संबंधित कार्यालयात उपस्थित राहून कार्यालयीन कामे पार पाडण्याबाबत महापालिका कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे. त्यानुसार महापालिकेचे कर्मचारी तीन दिवस इलेक्शन ड्युटी आणि तीन दिवस महापालिकेत सेवा आहेत. तसेच या निवडणूक कामांसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना शनिवार व अन्य सुट्टीच्या दिवशीही निवडणूक काम सोपवले जाते. परंतु या सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाची भरपाई मुंबई महानगरपालिके ऐवजी निवडणूक आयोगाच्यावतीने (Election Commission) देण्याचा निर्णय झालेला आहे.

(हेही वाचा – Ticket Price Hike : प्रवाशांची लूट कधी थांबणार ? – सुराज्य अभियानाचा शासनाला प्रश्न)

परंतु सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून आठवड्यातून ०३ दिवस कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची आता आगामी विधानसभा निवडणूकीच्या कामाकरिता पूर्णवेळ सेवा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर व उपनगर मधील निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी १४.१०.२०२४ रोजी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या समवेत सर्व संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न आली. या बैठकीमध्ये सद्यस्थितीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून आठवड्यातून ०३ दिवस कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा आगामी विधानसभा निवडणूकीच्या कामाकरिता पूर्णवेळ अधिग्रहित करण्याचे तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असलेले जे कर्मचारी अशिक्षित असतील त्या कर्मचाऱ्यांऐवजी सुशिक्षित कर्मचारी निवडणूक कर्तव्यार्थ पाठविण्याची मागणी करण्यात आली. (Election Commission)

त्यानुसार आता महापालिका सामान्य प्रशासनाच्यावतीने परिपत्रक काढण्यात आले असून या परिपत्रकानुसार आठवड्यातून ०३ दिवस म्हणजेच गुरुवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी उपलब्ध करुन दिलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा यापुढे निवडणूकीच्या कामाकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून पूर्णवेळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मात्र शनिवार वा अन्य सुट्टीच्या दिवसाच्या कामाची भरपाई मुंबई महानगरपालिकेकडून मिळणार नाही. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून कार्यरत असलेले जे कर्मचारी अशिक्षित असतील त्या कर्मचाऱ्यांऐवजी सुशिक्षित कर्मचारी निवडणूक कर्तव्यार्थ पाठविण्यात येतील असे नमुद करण्यात आले आहे. (Election Commission)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.