मतदार यादीत नाव नाही? ५ डिसेंबरपर्यंत ‘या’ अ‍ॅपवर करा नोंदणी!

131

भारत निवडणूक आयोगातर्फे १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या काळात विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कालावधी राबविण्यात आला होता.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा कालावधी वाढवण्यात आला असून ५  डिसेंबरपर्यंत नागरिकांना मतदार यादीत नाव नोंंदवता येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस. मदान यांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढीसाठी भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. त्यानुसार ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

त्वरित नाव नोंदणी करा

संक्षिप्त पुनरिक्षणाचा कार्यक्रमास मुदतवाढ मिळाल्यामुळे येत्या १ जानेवारी २०२२ पर्यंत ज्या नागरिकांना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, अशा पात्र नागरिकांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळेच नाव दुरूस्ती, नावांची पडताळणी करणे, मतदारांनी नाव नोंदणीची खात्री करणे, तसेच ज्यांचे नाव समाविष्ट नाही, अशा नागरिकांनी त्वरित नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयुक्त मदान यांनी केला आहे.

( हेही वाचा : क्षणात हवय लसीकरणाचे प्रमाणपत्र, तर सेव्ह करा ‘हा’ मोबाईल क्रमांक )

महाव्होटर चॅटबोट

राज्य निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीची प्रक्रिया व त्या संबंधित सर्व माहिती, महाव्होटर चॅटबोट या अ‍ॅपवर उपलब्ध करून दिली आहे. हा अ‍ॅप तुम्ही http://bit.ly/mahavoter या लिंक वरून डाऊनलोड करू शकता. किंवा अधिक माहितीसाठी https://mahavoter.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.