केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) शुक्रवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Chief Election Commissioner Rajeev Kumar) म्हणाले की, “२०२४ च्या लोकसभा निवडणुका ही जागतिक पातळीवरील सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. ती यशस्वीपणे आणि शांततेने पार पडली. संपूर्ण देशाने निवडणुकीचा सण साजरा केला आणि जगात पहिल्यांदाच सर्वाधिक मतदान झाले. दरम्यान, येत्या काळात हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. (Election Commission)
(हेही वाचा – Bandra worli sea link का आहे इतकं प्रसिद्ध?)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, हरियाणामध्ये (Haryana Assembly Elections 2024) एक टप्प्यात निवडणूक होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येईल. तर जम्मू काश्मिरमध्ये (Jammu and Kashmir Assembly Elections) तीन टप्प्यात निवडणूक होणार आहे. या दोन्ही निवडणुकांचा निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्राबाबत मात्र कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. (Election Commission)
Assembly poll in J&K will be held in three phases, with voting on Sep 18, Sep 25, and Oct 1
Counting of votes on October 4 pic.twitter.com/XXvtq4ReEU
— ANI (@ANI) August 16, 2024
(हेही वाचा – मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? Nana Patole यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…)
केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये पहिला टप्पा १८ सप्टेंबरला, दुसरा टप्पा २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचा निकाल ४ ऑक्टोबरला (4 th oct votes counting) लागणार आहे.
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community