Election Duty : जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यमुक्त आदेश कागदावरच; निवडणुकीसाठी गेलेले कर्मचारी न परतल्याने महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर

3219
Election Duty : जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यमुक्त आदेश कागदावरच; निवडणुकीसाठी गेलेले कर्मचारी न परतल्याने महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर
Election Duty : जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यमुक्त आदेश कागदावरच; निवडणुकीसाठी गेलेले कर्मचारी न परतल्याने महापालिका आयुक्त ॲक्शन मोडवर
  • सचिन धानजी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहीत केलेल्या कार्यालयीन  कर्मचाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त केले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले असले तरी कधी आजही  निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या मुंबई महापालिका (BMC) कर्मचाऱ्यांपैकी ८० टक्के कर्मचारी हा पुन्हा महापालिकेत परतलेलाच नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दोन्ही जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून या कर्मचाऱ्यांना त्वरित कार्यमुक्त करावे असे कळवले आहे. मात्र, जिल्हाधिकारी यांनी कार्यमुक्त केल्यानंतरही हे महापालिका कर्मचारी सेवेत परत येत नाहीत किंवा जे शासनाचे अधिकारी त्यांना कार्यमुक्त करत नाही अशा कर्मचाऱ्यांसह शासनाच्या अधिकाऱ्यांवर आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिका आयुक्त हे कारवाई करण्याच्या पावित्र्यात असल्याची माहिती मिळत आहे. (Election Duty)
 भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला केल्यानंतर मुंबई महापालिकेच्या विविध विभाग आणि खात्यातील तब्बल १०,४०० कर्मचाऱ्यांची सेवा घेतली होती. मात्र, २० मे २०२४ रोजी मुंबईत लोकसभा निवडणुकीकरता मतदान पार पडल्यानंतरही  महापालिका कर्मचारी व अधिकारी हा महापालिका अधिकारी हे पुहा सेवेत परतले नाहीत. परिणामी पावसाळ्यातील महापालिकेच्या अनेक प्रकल्प कामांसह इतर दैनंदिन कामांची गैरसोय होवू लागली आहे. (Election Duty)
दरम्यान, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या निवडणूक शाखेने प्रसिध्दी पत्रक काढून मुंबई शहरातील मतदान 20 मे 2024 रोजी पार पडले.  मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या  कर्मचाऱ्यांना दुसऱ्या दिवशी तातडीने कार्यमुक्त करण्यात आले.  (Election Duty)
मतमोजणी प्रक्रिया ४ जून रोजी पूर्ण झाली.त्यानंतर उर्वरित विधानसभा मतदारसंघ कार्यालया अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून  कार्यालयात अहवाल  सादर करावा.  असे आदेश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी काढले होते. त्यानुसार अहवाल ही प्राप्त झाले आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक शाखा आणि मनुष्यबळ व्यवस्था मुंबई शहर यांनी कळविले आहे. तसेच  भारत निवडणूक आयोगाने शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या कार्यक्रम घोषित केला असून ही निवडणूक २६ जून २०२४ रोजी घेण्यात येणार आहे. या कामासाठी काही अंशी अत्यंत कमी कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आहेत. ते पूर्ण वेळ नाहीत. आपल्या मूळ कार्यालयाचे कामकाज सांभाळून आठवड्यातील फक्त दोन दिवस काही वेळ निवडणूक कामकाजावर आहेत.यामध्ये आपत्कालीन आणि अत्यावश्यक सेवा सोडून इतर विभागाचा समावेश आहे. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून महापालिकेचे जे कर्मचारी व अधिकारी निवडणूक कामासाठी जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहित केले होते.  (Election Duty)
त्यातील आतापर्यंत केवळ २० टक्केच कर्मचारी हे सेवेत परतले आहे. त्यामुळे महापालिकेच्या नागरी कामांवर होत असलेला परिणाम लक्षात घेता महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांनी दोनच दिवसांपूर्वी एक बैठक घेवून याचा आढावा घेतला. यात १०,४०० पैकी केवळ २० टक्केच कर्माचारी हे पुन्हा सेवेत परतले असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आयुक्तांनी दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयांना पुन्हा स्मरण पत्र पाठवण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही तर या स्मरण पत्रा नंतरही हे कर्मचारी सेवेत न परतता तिथेच सेवा करत असल्याचे दिसून आल्यास त्यांच्या विरोधात स्पष्टीकरण मागवून कारवाई करावी, तसेच जे उपजिल्हाधिकारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सेवा मुक्त करत नाहीत, आणि महापालिकेची अडवणूक करतात, त्यांच्या विरोधात आपत्कालिन व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात हे आदेश कागदावरच राहिल्याने महापालिका आयुक्त हे ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे जे कर्मचारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करून महापालिकेत येण्यास विलंब करतील ते कर्मचारी आता आयुक्तांच्या कारवाईस पात्र ठरले  जाण्याची शक्यता असून येत्या दोन दिवसात ही कारवाई हाती घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Election Duty)
 पावसाळ्यात केल्या जाणाऱ्या विविध आपत्कालीन कामांसाठी महापालिकेच्या कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो. परंतु लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024) यातील कर्मचारी नियुक्त केल्याने त्याच्या ताण महत्त्वाच्या खात्यांवर पडत होता. त्यामुळे निवडणूक संपल्याने आप्तकालिन विभागासाठीचा कर्मचारी व अधिकारी यांना कार्यमुक्त करावे अशी विनंती महापालिकेने केली होती. (Election Duty)
दरम्यान, निवडणूक कामकाजाकरिता मुंबई महानगर पालिकेतील (BMC) अत्यावश्यक, आपत्कालीन विभाग सोडून उर्वरित विभागातील  कर्मचाऱ्यांच्या सेवा  निवडणुकीच्या कामाकरिता देण्याबाबत यापूर्वीच विनंती केली होती.  त्यानुसार घनकचरा व्यवस्थापनातील प्रमुख अभियंता, पर्जन्य जलवाहिन्या, पाणीपुरवठा प्रकल्प, मलनि:स्सारण प्रचालन आणि  प्रकल्प, रस्ते आणि वाहतूक अशा  विभागांतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक कामाकरिता अधिग्रहीत केल्या नाहीत. (Election Duty)
मुंबई महानगरपालिकेचे (BMC) अधिकारी कर्मचाऱ्यांची निवडणूक कामातून  सुटका नाही. त्यामुळे विविध पावसाळी कामांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती.  लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊन आरोग्य विषयक भीती निर्माण होऊ नये, म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्याना कार्य मुक्त करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आल्याचे दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिका प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून बोलले जात आहे. (Election Duty)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.