Election Duty : निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना १५ लाख रुपये

204
Election Duty : निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना १५ लाख रुपये

निवडणुकीच्या कर्तव्यावर असताना महापालिकेच्या एखाद्या कर्मचारी तथा अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना आता १५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम १० लाख रुपये एवढी होती. या सानुग्रह अनुदानाच्या रकमेत तब्बल ५ लाखांनी वाढ झाली आहे. (Election Duty)

मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये निवडणूक कर्तव्यार्थ असताना जखमी अथवा मृत झालेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आला होता. या मंजूर धोरणानुसार निवडणूक कर्तव्यावर असताना मृत पावणाऱ्या कर्मचारी तथा अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान आणि दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोट झाल्यास २० लाख रुपये तसेच कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास कर्मचारी, अधिकाऱ्याला ५ लाख रुपये आणि दहशतवादी हल्ला आणि बॉम्बस्फोटात जखमी झाल्यास १० लाख रुपये अशाप्रकारे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. (Election Duty)

महापालिकेच्या मंजुरी घेतलेल्या या ठरावामध्ये आता सुधारणा करण्यात आली असून निवडणूक कर्तव्यावर असताना कर्मचारी अथवा अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांना १५ लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. तर दहशतवादी हल्ला आणि बॉम्बस्फोटात मृत पावल्यास कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना ३० लाख रुपये तसेच निवडणूक कामादरम्यान कायमस्वरुपी जखमी झाल्यास साडेसात लाख रुपये आणि दहशतवादी हल्ला, बॉम्बस्फोटात जखमी झाल्यास १५ लाख रुपये एवढे सानुग्रह अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. (Election Duty)

(हेही वाचा – येत्या गुरुवार पासून Gokhale Bridge वरील दुसरी पर्यायी मार्गिका होणार सुरू)

अधिकारी व कर्मचारी हे निवडणुकीच्या कामासाठी आपल्या घरातून अथवा कार्यालयातून बाहेर पडल्यासपासून ते निवडणुकीशी संबंधित कर्तव्ये पार पाडून आपल्या कार्यालयात अथवा घरी परत येई पर्यंतच्या कालावधीला निवडणूक कर्तव्यात येत असून मतदान यंत्र तयारीच्या सर्व प्रक्रिये दरम्यान नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांना मतदान अधिकारी तथा कर्मचारी म्हणून समजण्यात येईल, असे या मंजूर सुधारीत धोरणात नमुद केले आहे. (Election Duty)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई महापलिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला असून या कुटुंबांच्या वारसांना महापालिकेच्यावतीने आर्थिक मदत तसेच वारसंना नोकरीत सामावून घेण्याची प्रक्रिया राबवली असल्याची माहिती मिळत आहे. (Election Duty)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.