अरुंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण, चढता घाट, तीव्र उतार यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या इलेक्ट्रिक बस वारंवार रस्त्यातच बंद पडत आहेत. तसेच वळण घेताना अलिकडे बसला अपघाताचा धोका निर्माण झाल्याने सिंहगडाची इलेक्ट्रिक बस सेवा काही काळापुरती बंद करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच बसेस व चार्जिंग पॉइंटची संख्या वाढविणे आवश्यक असल्यामुळे मे महिन्यात सुरू करण्यात आलेली ही इलेक्ट्रिक बससेवा अवघ्या काही दिवसांतच करावी लागत आहे.
( हेही वाचा : पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी उलाढाल)
अवघ्या काही दिवसांत ई-बस सेवा बंद
सातत्याने वाढणारी वाहनांची गर्दी, गडावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी व प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने १ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिंहगड किल्ल्याकरता ई-बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. मात्र, ई-बस वारंवार रस्त्यातच बंद पडत असल्याने अवघ्या काही दिवसांत ही सेवा बंद करावी लागत आहे. यामुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Join Our WhatsApp Community