गडावर जाण्यासाठी १ मे पासून इलेक्ट्रिक बस

सुट्टीच्या दिवशी अनेक पर्यटक सिंहगडवर जातात. यामुळे सिंहगड घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. परंतु सिंहगडावर होणाऱ्या वाहतूककोंडीच्या समस्येचे लवकरच निराकरण होण्याची चिन्हे आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंहगडावर इलेक्ट्रिक बस धावणार असून, इलेक्ट्रिक बस सुरू झाल्यावर सिंहगडावर खासगी वाहनांना प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे खासगी वाहने गडाच्या पायथ्याशी ठेवून नागरिकांना या इलेक्ट्रिक बसने सिंहगडावर जावे लागणार आहे.

( हेही वाचा : खाद्यपदार्थांना महागाईचा फटका; वडापाव, समोसा,इडली, डोसा आणि चहाच्या किमतीत वाढ )

पीएमपीकडून चार बस उपलब्ध केल्या जाणार

सिंहगडावर खासगी वाहनांमुळे प्रदूषण व वाहनकोंडी होते. त्यामुळे किल्ल्यावर खासगी वाहनांना बंदी करण्यात यावी, अशी मागणी होत होती. याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी तत्काळ दखल घेतली. येथील खासगी वाहतूक बंद करून ग्रीन एनर्जीद्वारे पर्यटकांना वाहतूक पुरवण्याचे त्यांनी आदेश दिले होते. त्यासाठी वनविभाग आणि पीएमपीकडून सिंहगडावर युद्धपातळीवर काम सुरू होते. यानंतर पीएमपीने ई-बसच्या चाचण्या घेतल्या. आता सिंहगडावर जाण्यासाठी पीएमपीकडून चार बस उपलब्ध केल्या जाणार आहेत.

सुट्टीच्या दिवशी जवळपास दहा ते पंधरा हजार पर्यटक सिंहगडाला भेट देतात. या पर्यटकांना त्यांची खासगी वाहने पार्क करण्यासाठी जागा मिळत नसे. परंतु आता बससेवा सुरू झाल्याने वाहतूककोंडी होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here