मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीवर सहा वर्षांपूर्वी केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईच्या पहिल्या पाच वर्षांतील देखभालीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर पुढील तीन वर्षांच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येत आहे. या तीन वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. महानगरपालिकेतर्फे पालिका मुख्यालयाचा शतकोत्तर रौप्य महोत्सवी शुभारंभ सोहळा १ ऑगस्ट २०१७ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडला होता.
यासाठी ही विद्युत रोषणाई मुख्यालय इमारतीवर करण्यात आली होती. विद्युत रोषणाईची मूळ संकल्पना ही माजी स्थायी समिती अध्यक्ष शैलेश फणसे यांची होती आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने महापालिका मुख्यालयावर विद्युत रोषणाई केली केली होती. दररोज वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई हे मुंबईकरांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. तसेच राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त विषयानुरुप वेगवेगळ्या रंगांची विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.
हेही वाचा – Load Shedding : अपुऱ्या पावसाचा पुन्हा फटका; महाराष्ट्रासमोर लोडशेडिंगचे संकट)
त्यामुळे यासाठी पहिल्या पाच वर्षांच्या देखभालीचे कंत्राट संपुष्टात आल्यानंतर आता पुढील तीन वर्षांचे कंत्राट दिले जात आहे. या नव्या कंत्राटात या इमारतीवरील विद्युत रोषणाई ही नवीन थिम वापरुन केली जाणार आहे, आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व इतर शासकीय कार्यक्रमासाठी आवश्यतेनुसार ३ रंगांची रोषणाई केल्याववर इमारतीवर अशोकचक्र प्रक्षेपित करण्याच्या कामाचा समावेश करण्यात आला होता. या तीन वर्षांच्या कंत्राट कामांसाठी महापालिकेने ३.३९ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित धरला होता, त्यातुलनेत निविदेत भाग घेत पात्र ठरणाऱ्या वॉचडॉग सिक्युरिटी कंपनीने १ टक्का कमी बोली लावून हे काम ३. ३५ कोटी रुपयांमध्ये मिळवले. त्यामुळे विविध करांसह यासाठी ३.४८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे पुढील तीन वर्षांसाठी केल्या जाणाऱ्या देखभाल दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये खर्च केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community