समुद्राच्या उसळलेल्या लाटांपुढे विजेचे खांब जमिनदोस्त; दादर चौपाटीवरील खांबांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट?

समुद्र चौपाटीवर विद्युत रोषणाई करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी विजेचे खांब बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दादर चौपाटीवर तब्बल ८० विजेचे खांब बसवण्यात आले होते. परंतु या बसवलेल्या विजेच्या खांबांपैंकी दोन खांब मागील काही दिवसांमध्ये पडल्याने येथील सर्व खांबांच्या स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून त्यामुळे आता सर्व खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची गरज भासू लागली आहे. दरम्यान, दोन्ही खांबांची नव्याने उभारणी केली जात असली उर्वरीत सर्व खाबांचा समुद्राच्या उसळलेल्या लांटासमारे निभाव लागेल का याबाबतही साशंकता निर्माण झाली आहे.

( हेही वाचा : Municipal Corporation Election: ९ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत)

८० ते ९० विजेचे खांब

दोन वर्षांपूर्वी दादर ते माहिम चौपाटीपर्यंतच्या परिसरात विद्युत रोषणाई करण्याच्यादृष्टीकोनातून प्रखर विजेचे दिवे बसवण्याचा निर्णय घेतला होता. एकूण १.३ किलोमीटरच्या परिसरात तब्बल ८० ते ९० विजेचे खांब बसवण्यात आले होते. यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. हे खांब बसवण्याचे काम मागील पावसाळ्यात पूर्ण करण्यात आले होते. परंतु या खांबांपैकी इंदू मिलच्या पाठीमागील चौपाटीवरील दोन विजेचे खांब आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पावसात खवळलेल्या समुद्राच्या लाटा थेट आदळल्याने जमिनदोस्त झाले. त्यामुळे समुद्राच्या उधाण ळणाऱ्या लाटांपुढे या विजेच्या खांबांचा निभाव लागत नसल्याची बाब समोर आली आहे.

महापालिकेच्यावतीने हे खांब योग्यप्रकारे पायाची भरणी करत बांधकाम करत उभारले होते. परंतु या खांबांचे बांधकाम कुमकुवत असल्याने मोठ्या लाटांपुढे त्यांचा निभाव न लागल्यानेच समुद्रातील वाळू खचत जात हे खांब पडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उभारण्यात आलेल्या सर्व खांबाबाबतच स्थिरतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

समुद्राच्या लाटांमुळे हे खांब पडले असावे

मुंबई महापालिकेच्या यांत्रिक विद्युत विभागाच्यावतीने कंत्राटदाराची नेमणूक करून हे खांब उभारण्यात आले होते. मागील पावसाळ्यात या खाबांना कुठल्याही प्रकारे धक्का पोहोचला नव्हता. परंतु या पावसाळ्यात दोन खांब पडल्याने या भागातील वीज अभावी अंधार पडलेला पाहायला मिळत आहे. याबाबत यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काही दिवसांपूर्वी जे दोन खांब पडले होते, त्याठिकाणी नव्याने खांब उभारणीचे काम सुरु आहे. समुद्राच्या लाटांमुळे हे खांब पडले असावे अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here