सणासुदीच्या काळात अनेक लोक बाहेरगावी फिरायला जातात. मुंबई-पुणे प्रवासासाठी एसटी महामंडळाकडून शिवनेरी बसेस चालवल्या जातात. परंतु आता मुंबई-पुणे महामार्गावर शिवाई बस धावणार आहे. एसटी महामंडळाने विजेवर धावणारी पहिली शिवाई वातानुकूलित बस पुणे ते अहमदनगर मार्गावर सुरू केली. यानंतर डिसेंबरपासून मुंबई-पुणे मार्गावर शिवाई बस प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या मार्गावर १०० शिवाई बस चालवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यावर राज ठाकरेंचे पुन्हा फडणवीसांना पत्र, म्हणाले…)
या इलेक्ट्रिक बसमधून प्रवाशांना प्रदूषणमुक्त आणि स्वस्तात प्रवास करता येईल. डिसेंबरपासून शिवाई बसगाड्या मुंबई, ठाणे ते पुणे या मार्गावर धावणार आहेत. १५० शिवाई बसेसपैकी पहिल्या टप्प्यात ५० बस आणि दुसऱ्या टप्प्यात १०० बस दाखल होतील. सध्या मुंबईतील परळ आगार वगळता अन्य सगळ्या आगारात शिवाई बससाठी चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. ठाण्यातही बस चार्जिंग सुविधा उपलब्ध आहे. परळ आगारात सुद्धा लवकरच हे काम पूर्ण केले जाईल असे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.
शिवाई बसचे नियोजन
- दादर ते पुणे रेल्वे स्थानक व्हाया चिचंवड – २४ बस
- परळ ते स्वारगेट – २४ बस
- ठाणे ते स्वारगेट – २४ बस
- बोरिवली ते स्वारगेट – २४ बस