मध्य रेल्वेच्या ‘या’ ९ स्थानकांजवळ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा!

प्रदूषण कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावत मध्य रेल्वेने मुंबई विभागातील महत्त्वाच्या ९ स्थानकांवर EV (इलेक्ट्रिक वाहन) चार्जिंग सुविधा उभारल्या आहेत.

या’ ९ स्थानकांजवळ इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा!

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, भायखळा, परळ, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, भांडुप, कल्याण आणि पनवेल या ९ स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर ईव्ही चार्जिंग सुविधा पर्यावरणीय स्थिरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. रेल्वे स्थानकांवर ही सार्वजनिक चार्जिंग सुविधा 24×7 कार्यरत आहे. यामुळे नागरिक रेल्वे स्थानकांजवळील महत्त्वाच्या ठिकाणी त्यांचे इलेक्ट्रिक व्हेहीकल चार्ज करू शकतील.

( हेही वाचा : एसटीच्या अमृत योजनेला ज्येष्ठ नागरिकांची पसंती)

मुंबईतील रस्त्यावर मोठ्या संख्येने असलेल्या वाहनांसाठी, रेल्वे स्थानकांवरील ही इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा परवडणारी, कार्यक्षम आणि विश्वासार्ह चार्जिंग पॉईंट प्रदान करेल आणि त्यामुळे अधिक इलेक्ट्रिक वाहनांना रस्त्यावर धावण्यास प्रोत्साहन मिळेल आणि निरोगी हवा आणि स्वच्छ वातावरणास प्रोत्साहन देण्यास मदत होईल. येत्या काही वर्षांत 100% विद्युतीकरण, उर्जेचा वापर कमी करणे, सौर आणि पवन ऊर्जेच्या निर्मितीद्वारे ऊर्जेची मागणी पूर्ण करणे हे भारतीय रेल्वेचे उद्दिष्ट आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here