महाबळेश्वरमधील पर्यटनासाठी यापुढे विद्युत वाहन आवश्यक

महाबळेश्वर, पाचगणी या पर्यटनस्थळावरील विविध पाॅइंटस आणि प्रेक्षणीय स्थळांवर फिरायला जाण्यासाठी यापुढे विद्युत उर्जेवरील वाहने आवश्यक असणार आहेत. या स्वरुपाचा प्रस्ताव या दोन्ही पालिकांनी तयार करुन तो अंतिम मंजुरीसाठी पर्यटन मंत्रालयात पाठवला आहे.

म्हणून केवळ विद्युत वाहनांना परवानगी

महाबळेश्वर, पाचगणी येथे रोज येणा-या इंधनावरील शेकडो वाहनांमुळे येथे वाहतूक कोंडी तर होतेच शिवाय यामुळे होणा-या वायुप्रदुषणामुळे येथील निसर्गालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. याचाच विचार करत महाबळेश्वर, पाचगणी या दोन्हीही नगर पालिकांच्या वतीने या पर्यटनस्थळी आल्यानंतर स्थानिक पर्यटनासाठी केवळ विद्युत वाहनांना परवानगी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

( हेही वाचा: सदाभाऊ खोत यांना मोदी सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा )

वाहने वाहनतळावर लावावी लागतील

या प्रस्तावानुसार, येथे पर्यटक आपल्या पेट्रोल- डिझेलवरील वाहनांनी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये येऊ शकतील. मात्र ही वाहने त्यांना येथेच वाहनतळावर लावावी लागतील. यानंतर या पर्यटन स्थळी फिरण्यासाठी पर्यटकांना येथे ठरवून दिलेल्या विद्युत वाहनांचा वापर करता येईल. जर पर्यटकांचे स्वत:चे वाहन हे विद्युत उर्जेवर चालणारे असेल, तर त्या वाहनांतून पर्यटक स्थानिक पर्यटन करुन शकतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here