Electric Vehicles :  एप्रिलपासून इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं होणार स्वस्त 

Electric Vehicles : इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने नवीन योजना आणली आहे

219
Electric Vehicles :  एप्रिलपासून इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं होणार स्वस्त 
Electric Vehicles :  एप्रिलपासून इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनं होणार स्वस्त 
  • ऋजुता लुकतुके

इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicles) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनं आणखी स्वस्त होणार आहेत. कारण, यासाठी सरकारनं  ५०० कोटी रुपयांची नवीन योजना आणली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे (Mahendra Nath Pandey) यांनी EMPS योजनेसाठी ५०० कोटी रुपये जारी करण्याची घोषणा केलीय. ही योजना १ एप्रिलपासून सुरुही झाली आहे.  (Electric Vehicles)

(हेही वाचा- Congress नेते संजय निरुपम शिवसेनेच्या (शिंदे) वाटेवर?)

५०० कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी गाड्या स्वस्त होणार आहेत. ही इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) योजना आता लागू झाली आहे. सध्या ही योजना ४ महिन्यांसाठी वैध असणार आहे. दरम्यान, अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे (Mahendra Nath Pandey) यांनी दिलेल्या माहितीनुसार,  EMPS योजनेसाठी ५०० कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. यामुळं देशातील इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री वाढण्यास मदत होईल. फेब्रुवारी २०२४ मध्ये, सरकारने FAME २ (FAME-II) योजनेंतर्गत वाटप वाढवून ११,५०० कोटी रुपये केले होते. यापूर्वी या योजनेचे बजेट १० हजार कोटी रुपये होते. ३१ मार्च २०२४ पर्यंत विकल्या जाणाऱ्या दुचाकी, तीन चाकी आणि कारवर हे अनुदान लागू असेल अशी माहिती अवजड उद्योग मंत्रालयानं दिली आहे.  (Electric Vehicles)

फेम इंडिया योजनेंतर्गत (Fame India Scheme), इलेक्ट्रिक टू, थ्री आणि फोर व्हीलरसाठी सबसिडी ७०८० कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यापैकी ५३११ कोटी रुपये इलेक्ट्रिक दुचाकींसाठी होते. तसेच, इलेक्ट्रिक बस आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधण्यासाठी ४०४८ कोटी रुपये देण्यात आले. फेम इंडिया योजनेचा (Fame India Scheme) उद्देश देशातील ईव्ही आणि चार्जर्सना सबसिडी प्रदान करणे आहे. जेणेकरून त्यांची विक्री वाढू शकेल. याशिवाय, या योजनेत देशात ईव्ही पार्ट्सच्या निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाते. (Electric Vehicles)

(हेही वाचा- Clean up Marshall : क्लीन अप मार्शल वसूल करणार डिजीटल पद्धतीने  दंड)

दरम्यान, २०१९ मध्ये सुरु झालेल्या FAME २ अंतर्गत, आतापर्यंत सुमारे १२ लाख ईव्ही दुचाकी, १.४१ लाख तीन चाकी आणि १६,९९१ चारचाकी वाहनांना अनुदान देण्यात आले आहे. फेम २ योजनेअंतर्गत ५,८२९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अनुदान वितरित केले गेले आहे. त्यामुळेच काही काळापासून ईव्ही वाहनांची मागणी वाढली आहे. एका अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी (Aether Energy) आणि बजाज (Bajaj) सारख्या मोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. यामुळं बॅटरीवर चालणाऱ्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींच्या किंमतीतील तफावत कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय, सरकारकडून मिळणारा पाठिंबाही इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. (Electric Vehicles)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.