इलेक्ट्रिक वाहनांचे पर्यावरणपूरक, इंधन बचत असे असंख्य फायदे आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याचा कल वाढत जात आहे. राजधानी दिल्लीत देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन सुरू होणार आहे. हे चार्जिंग स्टेशन केवळ मोठे नसून सर्वात स्वस्त सुद्धा असणार आहे. अशी माहिती उर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दिल्लीत ५०० ईव्ही पॉईंट आणि १०० चार्जिंग स्टेशनसाठी येत्या ३ महिन्यात तयार होणार आहेत.
२०२५ पर्यंत २५ टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील
देशातील सर्वात मोठ्या चार्जिंग स्टेशनवर फक्त २ रुपये प्रति मिनिट दराने इलेक्ट्रिक वाहने चार्ज केली जाणार आहेत. दिल्लीत २ रुपये तर इतर राज्यांमध्ये हे दर १० ते १५ रुपये असणार आहेत. सरकारने २०२५ पर्यंत २५ टक्के वाहने इलेक्ट्रिक असतील असे धोरण तयार केले होते. यानुसार २७ जून २०२२ पर्यंत दिल्लीत १०० चार्जिंग स्टेशन आणि ५०० ईव्ही पॉईंट तयार होणार आहेत. याआधी एनसीआर गुरूग्राम मध्ये भारतातील सर्वात मोठे ईव्ही चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आता गाईडशिवाय मिळवा पर्यटनस्थळांची माहिती! )
इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून सरकारकडून फेम-इंडीया योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community