एकीकडे महागाईमुळे सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले असताना, आता त्यांना वीजेचा शडक बसण्याची देखील शक्यता आहे. वीजेची खरेदी महाग झाल्यामुळे त्याचा फटक थेट वीज ग्राहकांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामांन्यांचं टेन्शन वाढण्याची चिन्हं आहेत.
सध्या देशात वीजेची टंचाई असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसाठी कोळसा आयात करावा लागत आहे. त्यामुळे वीज आयातीसाठी होणारा खर्च हा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक युनिट मागे ग्राहकांना 60 पैसे अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. राज्यातील वीज पुरवठादार कंपनी महावितरणकडून याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
प्रतियुनिट 60 पैसे वाढण्याची शक्यता
वाढती गरज पाहता देशात वीजनिर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कोळशाचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोळसा आयात करावा लागत असल्यामुळे महावितरणचा वीजनिर्मिती खर्च हा 23 टक्क्यांनी वाढल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतियुनिट 60 पैशांनी वाढ होण्याची शक्यता असल्याने ग्रहकांचं महिन्याचं बील साधारण 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.
खाजगी वीजनिर्मिती कंपन्यांकडून देखील 40 हजार कोटी रुपयांची वसुली बाकी असल्यामुळे महावितरणकडून वीज दरवाढीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community