Electricity Bill : यंदा वीज बिल कमी होणार? महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव 

Electricity Bill : महावितरण कंपनीने १ ते १५ टक्के दर कपातीचा प्रस्ताव ठेवला आहे.

135
Electricity Bill : यंदा वीज बिल कमी होणार? महावितरणचा दर कपातीचा प्रस्ताव 
  • ऋजुता लुकतुके

२०२५ मध्ये सर्वसामान्यांना वीज बिलातून मोठा दिलासा मिळू शकतो. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, वीज बिलात साधारण १ ते १५ टक्के कपात अपेक्षित आहे. या निर्णयाचा लाभ महाराष्ट्रातील २ कोटी वीज ग्राहकांना होणार  आहे. महावितरणने यासंदर्भातील प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला दिला आहे. २०२५-२६ ते २०२९-३०  या कालावधीमध्ये १२ टक्के ते २३ टक्के दर कपातीचा प्रस्ताव आहे. (Electricity Bill)

२०२५-२६ या वर्षामध्ये जे घरगुती वीज ग्राहक १०० यूनिट पेक्षा कमी वीज वापरतात त्यांना सध्याच्या दरात १५ टक्के कपातीचा फायदा मिळेल आणि ही कपात प्रत्येक वर्षी वाढत जाणार आहे. २०२७-२८ मध्ये १०० युनिटच्या आत वापर असलेल्या लोकांसाठी ही कपात १९ टक्के असेल तर त्यापुढील वर्षी ती २५ टक्क्यांपर्यंत वाढेल. फक्त इतकंच नाही तर युनिटमागे मोजावे लागणारे पैसेही कमी होणार आहेत. सध्या एका युनिटमागे ५.१४ रुपये मोजावे लागतात. तो दर आता नवीन प्रस्तावानुसार २.२० रुपयांवर खाली येईल. (Electricity Bill)

(हेही वाचा – ख्रिस्ती धर्मांतराचा डाव Hindu संघटनांनी उधळला; २ पाद्रींसह ७ जणांना अटक)

जे ग्राहक १०१ ते ३०० युनिट वीज वापरता, त्यांचा दर युनिटमागे १ रुपया ७६ पैशांनी कमी होईल. राज्यातील सर्वात जास्त ग्राहक संख्या या वर्गात मोडते. जे ग्राहक ३०१ ते ५०० युनिट वीज प्रतिमहिना वापरतात त्यांना एका यूनिटला १५.६० रुपये द्यावे लागतात. २०२९-३० पर्यंत हा दर १५.२९ रुपयांपर्यंत खाली येऊ शकेल. तर ५०० पेक्षा जास्त युनिट वापरणाऱ्या लोकांनाही कपातीचा फायदा मिळेल. महावितरणचे महाराष्ट्रात एकूण २ कोटी ८० लाख वीज ग्राहक आहेत. यामध्ये भांडूप, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि उर्वरित महाराष्ट्राचा समावेश आहे. यामध्ये २ कोटी ग्राहक घरगुती वीज ग्राहक आहेत. (Electricity Bill)

महाराष्ट्रातून उद्योगांनी बाहेर जावू नये यासाठी औद्योगिक ग्राहकांना देखील दिलासा देण्यासंदर्भात प्रस्ताव आहे. साधारणपणे त्यांच्या वीज बिलात तीन महिन्यात ३ टक्क्यांच्या कपातीचा प्रस्ताव आहे. तर, पाच वर्षात ११ टक्क्यांची कपात अपेक्षित आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या वीजेच्या दरात मात्र वाढ प्रस्तावित आहे. सध्या त्यासाठी प्रतियूनिट दर ७.३० रुपये आकारला जातो. त्यात ३५ टक्क्यांची वाढ अपेक्षित असून एका यूनिटचा दर ९.८६ रुपये असू शकतो. (Electricity Bill)

(हेही वाचा – Mumbai School Bomb Threat: मुंबईच्या ‘या’ शाळेत बॉम्बची धमकी; बॉम्बशोधक पथक आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, पण…)

महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी महावितरणनं इतिहासात पहिल्यांदा वीज दर कपातीचा प्रस्ताव दिला आहे. नुतनीकरण क्षम ऊर्जा प्रकल्पातून किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार असल्याने आणि कृषीपंपासाठी लागणार्‍या वीजेचा वापर सौर कृषीपंपांसाठी केल्यानं कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला. लोकेश चंद्रा यांनी २०३० पर्यंत वीजनिर्मिती क्षमता ८१००० मेगा वॅटपर्यंत नेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे.

१ एप्रिल पासून वीज दर कपातीचा निर्णय लागू होऊ शकतो. वीज बिलामध्ये पुढील पाच वर्ष १२ ते २३ टक्के कपात होऊ शकते, असं महावितरणचे संचालकविश्वास पाठक यांनी म्हटलं. मुख्यमंत्री सौर ऊर्जा कृषी फीडर प्रकल्प २.० यामधील प्रकल्प येत्या दोन वर्षात सक्रिय होतील. या प्रकल्पातून १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचा फायदा  घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांना होईल, असं पाठक म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.