मुंबईकरांचे बजेट येत्या काही दिवसातच कोलमडणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे मुंबईकर रहिवाशांना आता वीजबिलासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. सध्याचा सरासरी वीज पुरवठ्याचा दर ७.२७ रुपये प्रति युनिट आहे. हे दर वाढवण्यासाठी अदानी आणि टाटा समूहांनी राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे वीजबिलात आता थोडी थोडकी नाहीतर तब्बल ५० रुपयांची वाढ होणार आहे.
( हेही वाचा : बालगृहातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार! पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, लातूरमधील धक्कादायक घटना)
वीज दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडले
वीजबिलात जवळपास ५० रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी वीज दरात १ टक्का प्रस्तावित वाढ केली आहे. दानी आणि टाटा समूहांनी केलेल्या याचिकेवर पुढच्या महिन्यात सुनावणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यांपासून ही दरवाढ लागू करण्यात येईल आणि एप्रिल महिन्यापासून ग्राहकांना नव्या दरात वीजबिल मिळेल.
वाढत्या कोळशाच्या किमतीमुळे वीजदरात वाढ होण्याची शक्यता आहे. दूध, अंडी आणि आता लवकरच वीजबिलात सुद्धा वाढ होणार असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.
Join Our WhatsApp Community