ग्राहकांना विजेच्या खर्चावर संपूर्ण नियंत्रणाचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्याचे महत्त्वाचे पाऊल महावितरणने उचलले आहे. तसेच वीजग्राहकांना त्यांच्या मर्जीनुसार वीजवापराचा खर्च निश्चित करण्याचा अधिकार देणारे प्रीपेड स्मार्ट मीटर राज्यभर बसविण्याची तयारी सुरू झाली असून, काही महिन्यांत हे मीटर टप्प्याटप्प्याने कार्यरत होतील. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीजग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण व ग्राहकाभिमुख सेवा देण्याची सूचना केली आहे. (Electricity News)
राज्यातील महावितरणच्या दोन कोटी ४१ लाख ग्राहकांचे सध्याचे पारंपरिक मीटर बदलण्यात येणार असून, त्याऐवजी प्रीपेड स्मार्ट मीटर बसविण्यात येईल. स्मार्ट मीटर बसविल्यावर वीजग्राहक मोबाईल फोनप्रमाणे विजेसाठी पैसे भरून वीज वापरतील. विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करता येईल.मुख्य म्हणजे ग्राहकांना नवा प्रीपेड स्मार्ट मीटर मोफत मिळेल. या मीटरचा खर्च केंद्र सरकारकडून मिळालेल्या अनुदानातून तसेच महावितरणतर्फे करण्यात येणार आहे. सध्याच्या पद्धतीत वीजग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे रीडिंग घेतले जाते व त्यानुसार बिल पाठविले जाते. अचानक रात्री वीज खंडित होणार नाही. (Electricity News)
याचा फायदा नक्की कसा होणार
किती वीज वापरली याची माहिती ग्राहकाला नियमितपणे मोबाईल फोनवर मिळेल. त्यामुळे भरलेल्या पैशापैकी किती पैसे शिल्लक आहेत व आर्थिक नियोजनानुसार विजेचा वापर किती करायचा हेसुद्धा ग्राहकांना समजेल.प्रीपेड स्मार्ट मीटरमध्ये ग्राहकाने भरलेले पैसे संपले की वीजपुरवठा खंडित होईल. पण ग्राहकांना त्यांच्या मोबाईलवर वीजवापर आधीच माहिती झाल्यामुळे तसेच किती पैसे उरले आहेत, हेसुद्धा माहिती झाल्यामुळे नव्याने पैसे भरणे सुलभ होईल. घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाइन पेमेंटचीही सुविधा आहे. ग्राहकाचे पैसे संपत आल्यावर त्याला मोबाईलवर मेसेज पाठविण्याची व्यवस्था आहे.
(हेही वाचा : Delhi Murder : दिल्ली पुन्हा हादरली; स्वित्झर्लंडहून बॉयफ्रेंडला भेटायला आलेल्या महिलेची हत्या)
एखाद्या ग्राहकाने विजेसाठी भरलेले पैसे मध्यरात्री संपले तर अचानक रात्री वीजपुरवठा बंद होणार नाही. सायंकाळी सहा ते सकाळी दहा या वेळेत पैसे संपले तरी वीजपुरवठा सुरू राहील. संबंधित ग्राहकाने दुसऱ्या दिवशी सकाळी दहापर्यंत पैसे भरून वीजपुरवठा सुरू ठेवायचा व त्यामधून पैसे संपल्यानंतर वापरलेल्या विजेचे पैसे वजा होतील, अशी सुविधा या मीटरमध्ये केलेली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community