मुंबई शहर व उपनगरातील सतत वाढणाऱ्या वीजमागणीला पूरक ठरण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) महत्त्वाकांक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण केला आहे. महापारेषणने ४०० के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ वर जुने कंडक्टर बदलून उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) बसवण्याचे काम अवघ्या १७ दिवसांत पूर्ण केले. (Electricity Transport Capacity)
(हेही वाचा- दरवर्षी ५ हजार लालपरी बसेस खरेदी करण्याचा ST Corporation चा निर्णय)
या प्रकल्पामुळे वाहिनी क्र. १ ची वीजवाहन क्षमता १००० मेगावॅटवरून २१०० मेगावॅटपर्यंत वाढली आहे. वाहिनी क्र. २ च्या क्षमतेत आधीच वाढ झाल्याने दोन्ही वाहिन्यांच्या एकत्रित क्षमतेने २००० मेगावॅटऐवजी ४२०० मेगावॅट विजेचा वहन करण्याची क्षमता प्राप्त झाली आहे. (Electricity Transport Capacity)
उंच तांत्रिक प्रगती आणि आव्हानांवर मात
२३ किमी लांबीचे हे काम पूर्ण करताना रेल्वे, महामार्ग, उच्चदाब वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भूभाग, वनक्षेत्र, तसेच स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यात आले. ५०० हून अधिक कुशल कामगारांच्या सहभागाने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने हे काम युध्दपातळीवर वेळेआधीच पूर्ण करण्यात आले. (Electricity Transport Capacity)
(हेही वाचा- BMC : महापालिकेचे सात पैकी दोन सहायक आयुक्त २६ जानेवारीनंतर होणार सेवेत रुजू)
महापारेषणची पुढील वाटचाल
या प्रकल्पामुळे मुंबईतील वीजपुरवठा अधिक स्थिर आणि सक्षम होईल, तसेच वाढत्या वीजमागणीला त्वरित प्रतिसाद देणे शक्य होईल. महापारेषणने दाखवलेल्या वेगवान कामगिरीमुळे मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत क्रांतिकारी सुधारणा झाली आहे. (Electricity Transport Capacity)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community