हाजीअलीत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती

89

वत्सलाबाई देसाई चौक(हाजीअली) जवळील चौकात असणा-या केशवराव खाड्ये मार्गालगत मुंबई महापालिकेच्या भूखंडावर कचरा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत दररोज २ हजार किलो कच-यापासून प्रथम गॅस निर्मिती करण्यात येईल. त्यानंतर या गॅसचा उपयोग करुन जनित्राच्या आधारे वीज निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज साधारणपणे २५० ते ३०० युनिट वीज निर्मिती केली जाणार असून, या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.

वीज खर्चात होणार बचत

या प्रकल्पाअंतर्गत सुरुवातीच्या टप्प्यात महापालिकेच्या एका उद्यानात व घन कचरा व्यवस्थापन खात्याच्या एका कचरा विलगीकरण केंद्रात या विजेचा वापर केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज खर्चात काही बचत होण्यासह कचरा वाहून नेण्याच्या खर्चातही बचत करणे शक्य होणार असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
मुंबईतील पर्यटन स्थळांमध्ये एक महत्त्वाचे आकर्षण असणा-या आणि राणीचा रत्नहार अशी ओळख असणा-या मरिन ड्राईव्ह अर्थात नेताजी सुभाष मार्गालगत लवकरच एक नवे पर्यटन स्थळ आकारास येणार आहे.

आदित्य ठाकरेंनी केले उद्घाटन

मुंबई महापालिकेच्या डी-विभागातील ‘स्वराज्यभूमी’ अर्थात गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला कविवर्य भा.रा.तांबे चौकालगत समुद्राचे आणि मरिन ड्राईव्हचे वैशिष्ट्यपूर्ण व मनमोहक दर्शन घडवणा-या ‘दर्शक गॅलरी’चे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमानंतर लगेचच वत्सलाबाई देसाई चौकानजीक (हाजीअली जवळील चौक) असणा-या केशवराव खाड्ये मार्गालगत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या कच-यापासून वीज निर्मिती करणा-या प्रकल्पाचे लोकार्पण राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

३ महिन्यांत आकारास येणार गॅलरी

स्वराज्यभूमी गिरगांव चौपाटीच्या उत्तर टोकाला व नेताजी सुभाष मार्ग व कविवर्य भा. रा. तांबे चौकालगत पावसाचे पाणी समुद्रात वाहून नेणाऱ्या पर्जन जलवाहिनीच्या वरती सुमारे ४७५ चौरस मीटर आकाराची दर्शक गॅलरी उभारण्याच्या कामाला शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत समुद्राचे, चौपाटीचे तसेच ‘क्विन्स नेकलेस’ अशी ओळख असणा-या नेताजी सुभाष मार्गाचे विलोभनीय व मनमोहक दर्शन घडवणा-या गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. भरती–ओहोटी, समुद्राच्या लाटांची उंची व दाब आदी सर्व बाबींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करुन त्या अनुरुप ही गॅलरी उभारण्यात येणार आहे. ही गॅलरी उभारण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व संबंधित परवानग्या यापूर्वीच प्राप्त झाल्या असून, पुढील साधारणपणे ३ महिन्यांत ही गॅलरी आकारास येईल, अशी अपेक्षा आहे.

या दोन्ही कार्यक्रमा प्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेता विशाखा राऊत, सी व डी प्रभाग समिती अध्यक्षा मीनल पटेल, महापालिकेतील समाजवादी पक्षाचे गटनेते तथा आमदार रईस शेख, स्थानिक भाजप नगरसेविका ज्योत्स्ना मेहता, , शिवसेना स्थानिक नगरसेविका अरुंधती दुधवडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार, उप आयुक्त (परिमंडळ १) विजय बालमवार, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, घन कचरा व्यवस्थापन खात्याचे प्रमुख अभियंता अशोक यमगर; तसेच एरो केअर या संबंधीत सेवा पुरवठादार कंपनीचे अंकित जव्हेरी तसेच संबंधीत उच्चस्तरीय समितीचे प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.