Elevated Nature Trail : मलबार हिलच्या निसर्ग उद्यानाच्या देखभालीत राणी बागेचा ‘ऑरा’

609
Elevated Nature Trail : मलबार हिलच्या निसर्ग उद्यानाच्या देखभालीत राणी बागेचा ‘ऑरा’
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

दक्षिण मुंबईत कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाहा मेहता उद्यान यांना जोडणारे निसर्ग उद्यान अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेल (Elevated Nature Trail) बनवण्यात आल्यानंतर आता ठिकाणच्या सुरक्षा आणि स्वच्छतेसह इतर प्रकारच्या देखभालीवर राणी बागेचा ‘ऑरा’ दिसून येणार आहे. याठिकाणी पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग केले जात असून याचे स्लॉट बूक होत आहेत. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे तेथील सुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा समोर आल्याने महापालिकेच्यावतीने याच्या देखभालीसाठी खासगी संस्थेची नेमणूक केली आहे. या कामासाठी राणी बागेची देखभाल राखणारी ऑरा एफ. एम. एस. प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे.

(हेही वाचा – शकीदुल, दुलाल अख्तर, सद्दाम हुसैन… तृतीयपंथ बनलेल्या Bangladeshi infiltrators ना अटक)

मलबार हिलमधील कमला नेहरु उद्यान आणि आणि फिरोझशहा मेहता उद्यान अर्थात हँगिंग गार्डन हे महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अखत्यारित येत असून या उद्यानांमध्ये आता महापालिकेच्यावतीने निसर्ग उद्यान अर्थात एलिव्हेटेड नेचर ट्रेल (Elevated Nature Trail) बनवण्यात आले आहे. या निसर्ग उद्यानांमध्ये सुट्टीच्या दिवशी १५०० पर्यटक आणि इतर दिवशी सरासरी १००० पर्यटक भेट देत असतात.

(हेही वाचा – वक्फ विधेयकावरून Sanjay Nirupam यांचा शिवसेना उबाठावर घणाघात)

त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे व्यवस्थापन करणे, या वास्तूची स्वच्छता, तेथे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, विद्युत व यांत्रिक बाबी आदींची योग्यप्रकारे देखभाल करण्यासाठी पुरेसा कामगार वर्ग नसल्याने या कामासाठी दोन वर्षांकरता खासगी संस्थेची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये हाय वे कन्स्ट्रक्शन कंपनी आणि ऑरा एफ. एम. एस. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भाग घेतला होता. यामध्ये ऑरा या कंपनीची निवड करण्यात आली आहे. ऑरा ही कंपनी सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहायलाच्या देखभाल करत असून याच कंपनीवर आता मलबार हिलमधील निसर्ग उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी सोपवली आहे. या दोन वर्षांसाठी नेमलेल्या संस्थेला सुमारे दीड कोटींचे कंत्राट मंजूर करण्यात आले आहे. (Elevated Nature Trail)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.