बांधकाम कामगारांनी भरलेली लिफ्ट कोसळली, ४ जणांचा मृत्यू

अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग ११८ आणि ११९ बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे.

135

सध्या राज्यात संकटांची मालिका सुरु आहे. तशी ती मुंबईतही सुरु आहे. मुंबईतील वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका टॉवरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या टॉवरची लिफ्ट कोसळून ४ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जखमींना केईएम, नायर रुग्णालयात दाखल!

वरळी भागात बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत संध्याकाळच्या सुमारास लिफ्ट कोसळली. अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ मार्ग ११८ आणि ११९ बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अजूनही ६ जण आतमध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने केईएम रुग्णालय आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

(हेही वाचा : पोलिस दलातील असाही एक ‘वाझे’ ! पोलिस उपाधीक्षकाने मागितली २ कोटींची लाच!)

दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत पार्किंगचे बांधकाम सुरू होते. याच दरम्यान लिफ्ट कोसळली. यात दुर्घटनेत सापडून ४ जणांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. बचावकार्य सुरू आहे. ६ जण आत अडकले असून त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीडीडी चाळ परिसर हा दाटीवाटीचा आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.