सरकारचे पत्रकारांना गिफ्ट, सिडकोचे घर घेणे होणार सोपे

139

सिडकोच्या गृहप्रकल्पात पत्रकारांना घर घेण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. यापुढे सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील पत्रकार प्रवर्गातील घरासाठी अर्ज करताना राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे पात्रता प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. याबाबतची अट राज्य सरकारने शिथिल केली असून, तसे निर्देश सिडकोला दिले आहेत.

राज्य सरकारच्या नव्या निर्देशानुसार यापुढे सिडको महामंडळाकडूनच योग्य ती शाहनिशा करुन पत्रकारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे अनेक पत्रकारांना आता सिडकोचे घर घेणे सुकर झाले आहे. सिडकोच्या माध्यमातून विविध आर्थिक स्थरातील घटकांसाठी घरे उपलब्ध करुन दिली जातात. या गृहप्रकल्पांत विविध प्रवर्गांप्रमाणेच पत्रकारांसाठीही राखीव घरे ठेवण्यात येतात. यापूर्वी पत्रकार प्रवर्गातील सदनिकेसाठी अर्ज करताना संबंधित पत्रकाराला सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क संचलनालयाकडून पत्रकार प्रवर्गातील असल्याबाबतचे पात्रता प्रमाणपत्र मिळवताना संबंधित पत्रकारांची कसरत होत होती.

( हेही वाचा: सर्वसामान्यांना वीज दरवाढीचा शॉक; राज्यात नोव्हेंबर महिन्यात विजेच्या दरात वाढ होण्याची शक्यता )

लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मोलाची भूमिका बजावणा-या पत्रकारांना सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील सदनिका मिळण्याचा मार्ग सोपा व्हावा, यादृष्टीने पात्रतेची अट शिथिल करण्याचे आदेश सिडकोला दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य पत्रकारांना घर घेणे सोयीचे होईल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.