इंग्लंडसह अनेक देशांत प्रतिबंधित असलेली आतंकवादी संघटना ‘हिज्ब उत-ताहरिर’ने (Hizb-ut-Tahrir) खलिफाचे राज्य आणणाऱ्यांना संपवण्याची चिथावणीखोर पोस्ट फेसबूकवर प्रसारित केली आहे. विखारी आतंकवादी संघटना ‘हिज्ब उत-ताहरिर’ने कॅनडामध्ये (Canada) वार्षिक परिषद आयोजित केली आहे. १८ जानेवारी रोजी कॅनडातील ओंटारियो येथे ही खिलाफत परिषद (Khilafah Conference) होणार आहे. हिज्ब उत-ताहरिर या संघटनेच्या फेसबूक खात्यावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये इस्लामेतरांना नष्ट करणे, हा या परिषदेचा विषय असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Kasganj Violence प्रकरणी एनआयए न्यायालयाने २८ आरोपींना सुनावली जन्मठेपेची शिक्षा)
मुसलमान अमेरिकेला संपवू शकत नाहीत का ?
हिज्ब उत-तहरिरने फेसबूकवर लिहिले आहे की, “अमेरिका खरोखरच इतकी शक्तीशाली आहे का की, आपला समुदाय तिला हरवू शकत नाही ? पूर्वीही रोमन आणि पर्शियन लोकांसारखी महासत्ता राज्ये होती; तरीही त्यांचा उम्माहने पराभव केला. कॉन्स्टँटिनोपलसारखी त्यांची मोठी शहरे आता मुस्लिम शहरे आहेत. त्या वेळी उम्माहला अल्लाहचा पाठिंबा होता. पुन्हा एकदा अल्लाहचा पाठिंबा मिळवण्यासाठी उम्माहने काय केले पाहिजे ? आजच्या वसाहतवादी महासत्तांविरुद्ध विजयी होण्यासाठी आपल्याला कोणती पावले उचलण्याची गरज आहे ? या प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या आगामी खिलाफत परिषदेत देऊ.”
या पोस्टसोबत मुस्लिमांच्या विजयाची दृश्ये दाखवणारा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. “आज आपण ज्या स्थितीत आहोत, त्यावरून जाणून घ्या की, अमेरिका, युरोप, रशिया, चीन आणि इतरांवर मात करण्यासाठी आपल्या उम्माहला काय लागेल. उथमानी खलिफा यांची राजवट शिखरावर असताना इस्लाम तीन खंडांमध्ये पसरला होती. खलिफाशी थेट लढू शकत नाहीत, हे पाहून वसाहतवादी शक्तींनी मुस्लिम भूमीतील विश्वासघातकी एजंट्सचा वापर करून खलिफा आतून नष्ट केला, ज्यामुळे 1924 मध्ये तुर्कीमध्ये खलिफाचे पतन झाले. वसाहतवादी त्यांचे तंत्रज्ञान, विशाल सैन्य, विशाल अर्थव्यवस्था आणि त्यांच्या व्यापक प्रभावाचा आपल्याविरोधात वापर करतील. तथापि, यापैकी कोणतीही ‘शक्ती’ अल्लाहच्या सामर्थ्याशी तुलना करू शकत नाही. अल्लाहने आमच्या उम्माहला दिलेल्या सामर्थ्याच्या विरोधातही ते उभे राहत नाही. महंम्मदने “संपूर्ण अरेबियाला इस्लामच्या अधिपत्याखाली कसे आणले” आणि रशिदा खलिफाने दोन प्रमुख साम्राज्यांचा पराभव कसा केला, याची या पोस्टमध्ये आठवण करून देण्यात आली आहे.
HuT च्या पोस्ट्समध्ये या परिषदेत चर्चिले जाणारे विषयही दिले आहेत. परिषदेच्या विषयांमध्ये अबू उमर यांचा ‘राष्ट्रवाद आणि राजवटी: इस्लामचे प्रमुख शत्रू’, मलिक अबू लुकमान यांचे ‘वसाहतवादी शक्ती: मिथकांचे खंडण आणि भीती दूर करणे’, बिलाल खान यांचे ‘केवळ खिलाफतच फिलिस्तीनला (Khilafah Conference) मुक्त करेल’ आणि डॉ. गेलानी यांचे ‘अल्लाहच्या विजयात निराश होणे निषिद्ध आहे’, आदी विषयांवर भाषणे होणार आहेत.
या पोस्टमध्ये काश्मीरचाही उल्लेख आहे. यामध्ये म्हटले आहे की, तथाकथित इस्लामिक शक्तींनी फिलिस्तीन, काश्मीर आणि इतर ठिकाणांसह जगभरातील त्रास सहन करणाऱ्या मुस्लिमांसाठी काहीही केलेले नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community